Folowers

ठाणे गुन्हे शाखा घटक ५ ची दमदार कामगिरी; घरफोडी करणाऱ्या टोळीकडून १५ तोळे सोने, ४ किलो चांदीसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, ६ गुन्हे उघड

ठाणे, दि. २१ सप्टेंबर २०२६ -श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरी करणाऱ्या चोरट्यांकडून ठाणे गुन्हे शाखा घटक ५ वागळे युनिटने १२ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.


श्रीनगर पोलीस ठाणे गु.र.नं. २९८/२०२६ मधील फिर्यादी आरती लालन यांच्या घराची सेफ्टी लॉकची कडी उघडून १५,९८,५०० रुपयांचे सोने-चांदी व मोबाईल चोरी झाला होता. या गुन्ह्याचा घटक ५ वागळे युनिटकडून समांतर तपास सुरू होता. ८० ते ८५ CCTV फुटेजचे तांत्रिक विश्लेषण व तांत्रिक तपास करून आरोपींचा शोध घेण्यात आला.


पोलिसांनी राजस्थान, पाली येथून २ आरोपी व सुरत, गुजरात येथून १ आरोपीस ताब्यात घेतले.

अटक आरोपी:

१) प्रदिप कमलेशकुमार गौतम (२५), मुळ गाव कोलसा बस्ती, उत्तर प्रदेश - सध्या शांतीनगर, भिवंडी

२) राजकुमार ठाणाराम राजनाथ (२०), रा. सुरत, गुजरात

३) दक्षा जितेंद्र मारवाडी (२०), रा. नारलाई, जि. पाली, राजस्थान - सध्या भिवंडी


आरोपींची पद्धत - भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरे हेरून पाळत ठेवून घरफोडी करणे.


त्यांच्याकडून १५२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ०४ किलो १५ ग्रॅम चांदी, २,५५,००० रोख व ४ मोबाईल फोन असा एकूण १२,०२,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


या मुद्देमालामुळे ठाणे शहरातील ५ गुन्हे उघडकीस आले आहेत:

१) रबाळे - गु.र.नं. ८००/२०२६

२) नारपोली - १०५७/२०२६

३) वागळे इस्टेट - ३२०/२०२६

४) राबोडी - १५१/२०२६

५) राबोडी - १९०/२०२६


ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहायक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटक ५ चे वपोनि गोरखनाथ घार्गे, सपोनि शरद पाटील, पोनि खुबेर साठे, चौधरी, सामि, काळे व पथकाने केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत