Folowers

आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश सुपूर्द: माथाडी कामगारांच्या मेळाव्यात सामाजिक बांधिलकीचा पुढाकार


तुर्भे | मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘गुणवंत कामगार पुरस्कार वितरण व माथाडी कामगार मेळावा’ आज तुर्भे येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी राज्यावर निर्माण झालेल्या दुष्काळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी ठाणे महानगपालीकेचे नगरसेवक श्री. भरत चव्हाण यांच्या वतीने देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश मुख्यमंत्री याच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 


राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि संकटग्रस्त बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याची सामाजिक बांधिलकी जपत हा मदतीचा हात पुढे करण्यात आला. नैसर्गिक संकटाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त न करता आपल्या परीने योगदान देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याची भावना आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी यावेळी व्यक्त केली.


आज राज्यातील अनेक शेतकरी आणि कष्टकरी बांधव दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्या कठीण काळात समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून संकटग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, यासाठी केलेला हा प्रयत्न त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना अधिक दृढ करणारा आहे.


राज्यातील कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हीच लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे, अशी भूमिका आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी यावेळी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत