Folowers

वागळे इस्टेटमध्ये घराची भिंत पडली; सुदैवाने जीवितहानी नाही


ठाणे,  (प्रतिनिधी): ठाणे पश्चिमेतील वागळे इस्टेट येथील अंबिका नगरमध्ये मंगळवारी दुपारी जुन्या चाळीच्या घराची भिंत पडल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.


०५/०८/२०२६ रोजी दुपारी १२:५६ वाजता शिवसेना शाखेजवळ, मैत्री हाईट्सच्या बाजूला असलेल्या अंबिका नगर क्र. १येथील भालचंद्र बबन पष्टे यांच्या मालकीच्या तळ+१ मजली चाळीच्या घराची भिंत पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली.


माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, वृक्ष प्राधिकरण, महावितरण आणि अतिक्रमण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सोबत स्थानिक नगरसेविका सौ. वर्षा शेलार मॅडम देखील उपस्थित होत्या.


आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धोकादायक भिंत आणि झाडाची फांदी कापून बाजूला केली. महावितरणने सुरक्षेसाठी घराचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, परिसरात धोकापट्टी लावण्यात आली आहे. सध्या जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.


भिंत पडल्याने घरातील कुटुंबाने तात्पुरती राहण्याची व्यवस्था नातेवाईकांकडे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत