Folowers

कापुरबावडी पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

 


ठाणे : कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी दि. २७/०७/२०२६ रोजी सकाळी १ ते २ या वेळेत मा. पोलीस आयुक्त, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी २५० ते ३०० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमात नागरी हक्क कार्यशाळा* घेण्यात आली. सरकारी वकील संजय मोरे आणि म.पो.नि. सोनाली धांडे-पाटील यांनी ज्येष्ठांना कायदे विषयक मार्गदर्शन केले. 


किम्स हॉस्पिटलचे डॉ. हितेश संघवी आणि डॉ. कमलनाथ यांनी कॅन्सर व हृदयरोगाबाबत आरोग्य मार्गदर्शन केले. *ठाणे जनता सहकारी बँकेचे* श्री. प्रशांत राजे यांनी ऑनलाईन फसवणूक व आर्थिक सुरक्षा यावर, तर *ईगल ब्रिगेडचे* श्री. विश्वनाथ बिवलकर यांनी सायबर फसवणुकीपासून बचावाबाबत माहिती दिली.


यावेळी पोलीस उप आयुक्त श्री. प्रशांत कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती ममता डिसोजा यांनी ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.


कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नागरिकांनी देशभक्तीपर गीत गायन सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम उत्साहात पार पडला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत