ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई ३ कोटींचा १.५२० किलो एम.डी. सह एकास अटक
ठाणे : गुन्हे शाखा, घटक-१ ने ३ कोटी ४ लाख रुपये किमतीचा १ किलो ५२० ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त करत एका इसमास अटक केली आहे.
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पो.नि. अमोल वालझाडे यांच्या पथकाने दि. २६/०७/२०२६ रोजी रात्री कल्याण फाटा, क्विन्स केअर हॉस्पिटलसमोर कारवाई केली. यावेळी ऑटो रिक्षा क्र. MH-04-MT-3662 मधून एम.डी. विक्रीसाठी आलेला *सलमान मुन्ना शेख, वय ३०, रा. मुंब्रा* यास ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून एम.डी. पावडर, ऑटो रिक्षा, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ३ कोटी ५ लाख २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा रजि. नं. ३९५/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपीस दि. ३१/०७/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोउपनिरी प्रकाश शिरसाठ करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने केली.

Post a Comment