कोपरी पुलाजवळ कारला आग; कोपरी वाहतूक पोलिसांची तत्परता
वाहतूक सुरळीत ठेवण्याचा पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न
ठाणे : प्रतिनिधी
मुंबई नाशिक महामार्गावरील कोपरी पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी धावत्या कारला अचानक आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली. मात्र, प्रसंगावधान राखत कोपरी वाहतूक शाखेने तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणात ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टळले.
घटनेची माहिती मिळताच कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आगीपासून सुरक्षित अंतर ठेवत वाहनांची योग्य दिशेने वळवणूक करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखत वाहतूक शक्य तितकी सुरळीत ठेवण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.
दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या समन्वयातून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून,
या संपूर्ण घटनेत वाहतूक शाखेने दाखविलेली तत्परता, नियोजनामुळे महामार्गावरील मोठा गोंधळ टळला.

Post a Comment