ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक आज (सोमवारी) पार पडली. बैठकीला नवनियुक्त अध्यक्ष श्री. दिलीप शिंदे, सरचिटणीस श्री. राजीव डाके, खजिनदार श्री. राजेश शेटकर, कार्याध्यक्ष श्री. दीपक शेलार, उपाध्यक्ष श्री. निलेश मंडलिक तसेच त्यांच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी, माजी अध्यक्ष श्री. संजय पितळे, माजी अध्यक्ष श्री. आनंद कांबळे, माजी सरचिटणीस श्री. निलेश पानमंद आणि माजी खजिनदार श्री. विभव बिरवटकर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान माजी अध्यक्ष श्री. आनंद कांबळे, माजी सरचिटणीस श्री. निलेश पानमंद आणि माजी खजिनदार श्री. विभव बिरवटकर यांनी संघाचे बँक खाते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक स्वाक्षऱ्या केल्या. तसेच संघाशी संबंधित सर्व कागदपत्रे नवनियुक्त कार्यकारिणीकडे अधिकृतपणे सुपूर्द केली. यावेळी माजी पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment