घोडबंदर रोडवर दुचाकीला आग, कोणतीही जीवितहानी नाही
ठाणे : वाघबीळ येथील विजय गार्डनजवळ, शंभुजी हॉटेलसमोर घोडबंदर रोडवर दि. २८/०७/२०२६ रोजी रात्री १:०५ वा. च्या सुमारास _Honda Activa MH-02-HA-6899_ या दुचाकीला अचानक आग लागली.
घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान १ रेस्क्यू वाहनासह तात्काळ दाखल झाले. अग्निशमन जवानांच्या मदतीने रात्री ११:२० वा. पर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली.
या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
दुचाकी चालकाचे नाव - श्री. मनु चौहान

Post a Comment