कापुरबावडी ब्रिजजवळ ट्रकचा अपघात, 3 तास वाहतूक कोंडी
ठाणे : आज सकाळी ७:१५ वा. घोडबंदरवरून ठाण्याकडे येणाऱ्या कापुरबावडी ब्रिजजवळ पेट्रोल पंपाजवळ _TATA SIGNA ट्रक RJ-14-OJ-1046_ चा ताबा सुटून तो दुभाजकाला धडकला.
चुना पावडर घेऊन राजस्थानहून महाडला जाणाऱ्या या ट्रकच्या अपघात *कोणालाही दुखापत झाली नाही.
अपघातामुळे घोडबंदर-ठाणे रोडवर सुमारे 3 तास वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक पोलीस आणि क्रेन-जेसीबीच्या मदतीने ट्रक बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

Post a Comment