ठाण्यात ₹26 कोटींची अत्याधुनिक 'शूटिंग रेंज' उभारणार
ठाणे : ओवळा-माजिवडा मतदारसंघातील मौजे वाघबीळ, हिरानंदानी इस्टेटजवळ ठाणे महानगरपालिकेच्या भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्यात येणार आहे.
राज्याच्या नगरविकास विभागाने या प्रकल्पासाठी *₹26 कोटींच्या निधीला तत्त्वतः मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक* यांनी दिली.
या 4 मजली इमारतीत 10 मी., 25 मी. आणि 50 मी. अशा 3 शूटिंग रेंज, ट्रेनिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल, कॅफे, प्लेअर लाऊंज आणि 30 चारचाकी + 50 दुचाकींसाठी पार्किंगची सुविधा असेल.
“ठाण्यातील नेमबाजीपटूंना दर्जेदार सराव मिळावा आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत” हा या केंद्रामागचा उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.

Post a Comment