स्वयम संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनी दिव्यांगांसाठी 'फिरत्या वैद्यकीय केंद्रा'चा शुभारंभ
ठाणे : बहुविकलांग मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयम संस्थेने आपल्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर दिव्यांगांसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्र' सुरू केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले.
महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील दिव्यांगांना गावातच वैद्यकीय तपासणी, फिजिओथेरपी, UDID कार्ड- प्रमाणपत्र मार्गदर्शन, सहाय्यक उपकरणे वाटप, समुपदेशन आणि शासकीय योजनांची माहिती या केंद्रातून दिली जाणार आहे.
यामुळे दिव्यांग आणि त्यांच्या कुटुंबीयांचा प्रवास व आर्थिक ताण कमी होणार आहे, असे संस्थेच्या संचालिका *नीता देवळालकर* यांनी सांगितले.

Post a Comment