Folowers

ठाण्यातील आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 



ठाणे, २९ जुलै : शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या टेंभी नाक्यावरील आनंदआश्रमात आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. 


यावेळी उपमुख्यमंत्री *एकनाथ शिंदे* यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दिघे साहेबांच्या खोलीतील वस्तूंवर फुले वाहून त्यांना वंदन केले.


राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यापूर्वी मुंबईतील 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानीही मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी आमदार रवींद्र फाटक, शहरप्रमुख हेमंत पवार, राम रेपाळे, प्रकाश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत