राज्यातील 102 रुग्णवाहिका सेवा आता अधिक जलद; 'कॅशलेस पेट्रोकार्ड'चे उद्घाटन
मुंबई: राज्यातील 102 रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री *प्रकाश आबिटकर* यांच्या हस्ते _'कॅशलेस पेट्रोकार्ड'_ उपक्रमाचे उद्घाटन झाले.
यामुळे रुग्णवाहिकांना इंधनासाठी रोख रक्कम न देता थेट कार्डद्वारे व्यवहार करता येणार आहे. यामुळे आर्थिक पारदर्शकता वाढेल आणि इंधनामुळे होणारा विलंब कमी होईल.
यापुढे या 102 रुग्णवाहिका केवळ माता-बालकांऐवजी सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असून, 108 सेवेला पर्यायी व्यवस्था म्हणून बळ देण्यात येणार आहे.
राज्यातील एकूण *3195 रुग्णवाहिकांना* टप्प्याटप्प्याने HPCL चे कॅशलेस पेट्रोकार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

Post a Comment