सरकारी नोकरीच्या नावाखाली 70 लाखांची फसवणूक; 3 आरोपी जेरबंद
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून बँकेचे खोटे नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देऊन 70 लाख रुपये* उकळणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला.
भिवंडीतील तक्रारदाराला फसवणाऱ्या प्रकरणी *शाम विठोबा खातकर, जुगल कुमार लोढाया आणि रविद्र शंकूआ या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून खोटे शासकीय लेटर हेड आणि शिक्के जप्त केले आहेत.
आरोपींनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली होती. त्यांच्याविरुद्ध ठाणे, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात यापूर्वीही असे 9 गुन्हे दाखल आहेत.
नोकरीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment