मधुमेहग्रस्त पोलिसांची मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न, ठाणे पोलीस आयुक्तांचा स्तुत्य उपक्रम
ठाणे, 04 जुलै 2026 : ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर पोलीस दवाखान्यात मधुमेहग्रस्त पोलिसांसाठी मोफत नेत्र रोग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार, दि. 4 जुलै 2026 रोजी करण्यात आले.
दैनंदिन कामकाजात व्यस्त असल्यामुळे पोलीस कर्मचारी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मधुमेह असलेल्या रुग्णांनी वेळेत डोळ्यांची तपासणी न केल्यास त्यांना कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरातील तपासणी
या शिबिरात सिनियर नेत्र शल्यविशारद व रेटिना स्पेशलिस्ट डॉ. शहनवाज काझी यांनी रुग्णांची तपासणी केली.
शिबिरात खालील तपासण्या करण्यात आल्या:
- ब्लड शुगर तपासणी
- दृष्टी तपासणी
- काचबिंदू व मोतीबिंदू तपासणी
- डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणी
दिवसभर मुसळधार पाऊस असूनही या शिबिराचा 54 मधुमेहग्रस्त पोलिसांनी लाभ घेतला. तपासणी दरम्यान डोळ्यांसंबंधी विविध आजारांचे एकूण 9 रुग्ण आढळून आले. त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
आयोजन व सहकार्य
सदर शिबिराचे आयोजन पोलीस दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव वाघमारे यांनी केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री. अब्बास दमानिया यांनी तज्ञांशी समन्वय साधला.
श्रीमती शितल नानकर, श्री रमेश जाधव, श्री खुशल सुखदरे, श्रीमती रिया उत्तेकर, श्रीमती पूजा पवार व श्रीमती सायली यांनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.
शिबिराच्या समारोपावेळी डॉ. माधव वाघमारे यांनी डॉ. शहनवाज काझी व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.


Post a Comment