Folowers

ठाण्यातील यशोधन नगरमध्ये झाड कोसळून 25 वर्षीय तरुणी गंभीर जखमी; पार्क केलेल्या कारचेही नुकसान


वाऱ्यामुळे झाड अंगावर पडले; रेस्क्यू टीमने रस्ता मोकळा केला, जखमींना ज्युपिटर रुग्णालयात दाखल


ठाणे: ठाणे पश्चिम येथील यशोधन नगरमध्ये सोमवारी संध्याकाळी अचानक झाड कोसळल्याची घटना घडली. या अपघातात रस्त्याने जाणाऱ्या 25 वर्षीय तरुणीला गंभीर दुखापत झाली असून पार्क केलेल्या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटना कशी घडली?

ठा.म.पा. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दि. 07/07/2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता वर्दी मिळाली. यशोधन नगर हॉस्पिटलसमोर, यशोधन नगर येथे रस्त्याने जात असताना *कुमारी दृष्टी कदम, वय 25 वर्षे, रा. मिया हुसेन चाळ, शिवाजीनगर, वागळे इस्टेट* या तरुणीच्या अंगावर झाड कोसळले. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला पार्क केलेली MH 04 KF 3924 क्रमांकाची मारुती सुझुकी वॅगन आर कार देखील झाडाखाली सापडली. सदर कारचे मालक श्री. भूषण कांबळे आहेत.

जखमीवर उपचार सुरू

झाड पडल्याने दृष्टी कदम यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या रुग्णवाहिकेद्वारे त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाची तातडीची कार्यवाही

घटनास्थळी सन्मा. नगरसेवक हनुमंत जगदाळे, दिलीप बारटक्के, नगरसेविका सौ. शीतल ढमाले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह, TDRF जवान बससह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी दाखल झाले.


पडले झाड कापून बाजूला करण्यात आले असून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. झाड कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत