Folowers

धोकादायक होर्डिंग्जवर काँग्रेसचा इशारा ! आयुक्तांकडून तातडीने कारवाईचे आदेश

 


ठाणे : प्रतिनिधी

वादळी वारे व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवितास धोका ठरू शकणाऱ्या धोकादायक होर्डिंग्जबाबत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने पुढाकार घेत महापालिका आयुक्तांकडे तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी केली. या निवेदनाची आयुक्तांनी तातडीने दखल घेत संबंधित जाहिरात विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.


सोमवारी गांधीनगर सुभाषनगर परिसरात होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर शहरातील सर्व महाकाय होर्डिंग्जची सुरक्षितता तपासणे आणि आवश्यक ठिकाणी जाहिरातीचे फ्लेक्स अथवा पत्रे तातडीने काढणे गरजेचे असल्याचे काँग्रेसने निवेदनात नमूद केले.


यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने नागरिकांना आवाहन केले की, वादळी वारे किंवा मुसळधार पावसादरम्यान मोठ्या होर्डिंग्ज, जीर्ण झाडे, विद्युत खांब किंवा धोकादायक संरचनांच्या परिसरात अनावश्यक थांबणे टाळावे. अशा कोणत्याही धोकादायक होर्डिंगची माहिती तात्काळ महापालिकेला द्यावी, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत