Folowers

ठाणे वागळे इस्टेटमध्ये 45 वर्षे जुन्या इमारतीची गॅलरी कोसळली; 2 जखमी, इमारत तातडीने रिकामी


तिवारी भवनच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग पडला; उर्वरित भाग धोकादायक, नागरिकांचे शाळेत स्थलांतर


ठाणे, 04 जुलै 2026: ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथे 45 वर्षे जुन्या इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघात दोन नागरिक जखमी झाले असून इमारत धोकादायक स्थितीत असल्याने ती तातडीने रिकामी करण्यात आली आहे.

घटना कशी घडली?

ठा.म.पा. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दि. 04/07/2026 रोजी रात्री 10:56 वाजता वर्दी मिळाली. वागळे इस्टेट, किसन नगर नंबर-3, रोड नंबर-16 येथील तिवारी भवन (तळ + 2 मजली + 1 टेरेस फ्लॅट) या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 01 समोरील गॅलरीचा काही भाग कोसळला. उर्वरित भागही धोकादायक स्थितीत आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल

1.  नुरी इस्लाम शेख, वय 65 वर्षे, रा. शर्मा डॉक्टर गल्ली, किसन नगर-2: गॅलरीचा भाग अंगावर पडल्याने डोके, खांदा व पायाला दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना अष्टविनायक हॉस्पिटल, किसन नगर-2 येथे उपचारासाठी दाखल केले.

2.  सुरेश थापा, वय 36 वर्षे, रा. शंकर सोसायटी, किसन नगर-2: यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

प्रशासनाची तातडीची कार्यवाही

घटनास्थळी सन्मा. नगरसेवक योगेश जानकर, प्रकाश शिंदे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय.एम. तडवी, वागळे प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र चारी, उप अभियंता विजय फुलवर, अग्निशमन दल, पोलीस व महावितरण कर्मचारी दाखल झाले.


सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण तिवारी भवन इमारत रिकामी करण्यात आली आहे. परिसरात धोकापट्टी लावण्यात आली असून कोसळलेला गॅलरीचा भाग रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला आहे. 

कुटुंबाचे शाळेत स्थलांतर

टेरेस फ्लॅट नंबर 301 मध्ये राहणाऱ्या मनिषा परदेशी यांच्या कुटुंबातील 2 व्यक्तींना सुरक्षेच्या कारणास्तव ठा.म.पा. शाळा क्रमांक 23, किसनगर-2 येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. इमारतीत तळमजल्यावर 3 दुकाने व इतर मजल्यावरील सर्व रूम्स बंद आहेत.

पुढील कार्यवाही वागळे प्रभाग समिती व बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत