भारताची पहिली 250-टन इलेक्ट्रिक हायब्रीड क्रेन कार्यान्वित इंधन आणि प्रदूषणात मोठी बचत होणार - श्री दिनेश क्रेन्स
ठाणे : प्रमुख पायाभूत सुविधा कंपनी श्री दिनेश क्रेन्स लिमिटेड (SDCL) ने भारतातील पहिल्या 250-टन डिझेल-इलेक्ट्रिक हायब्रीड ऑल-टेरेन क्रेनची स्थापना केली आहे. ही क्रेन राजस्थानमधील हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या झिंक स्मेल्टर प्रकल्पात कार्यान्वित करण्यात आली आहे.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
क्रेनची वैशिष्ट्ये
1. दुहेरी ऊर्जा : इलेक्ट्रिक आणि डिझेल दोन्हीवर चालते. बॅटरी फुल चार्ज होण्यास 2 तास 50 मिनिटे लागतात.
2. बचत : पारंपरिक क्रेनच्या तुलनेत दरवर्षी सुमारे 93,600 लिटर डिझेलची बचत आणि 250 टन CO2 उत्सर्जनात घट होणार आहे.
3. उपयोग : अवजड औद्योगिक उचल कामांसाठी डिझाइन.
क्रेनचे उद्घाटन करताना भाजप नेते ओम प्रकाश शर्मा उपस्थित होते.
SDCL चे MD सुमित महेश जोशी* म्हणाले, "अवजड उचल उपकरणांच्या विद्युतीकरणाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही सुरक्षितता, उत्पादकता आणि शाश्वततेला प्राधान्य देतो."
पुढील योजना
कंपनीने पर्यावरणपूरक ताफा वाढवण्यासाठी आणखी हायब्रीड क्रेन आणि 100 ट्रेलर खरेदी करण्याची घोषणा केली.
SDCL च्या क्रेन सध्या बुलेट ट्रेन प्रकल्प, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू सारख्या राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत.
या परिषदेस संचालक कार्तिक जोशी, महेश जोशी, अश्विन जोशी आणि मन्नान जोशी उपस्थित होते.

Post a Comment