Folowers

ठाणे रेल्वेच्या कॅन्टीनमधील आरोग्यविषयक गैरप्रकार थांबवा


खासदार नरेश म्हस्के यांची मध्य रेल्वेकडे तात्काळ कारवाईची मागणी


ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील 'ऑरिजिन' या अधिकृत रेल्वे कॅन्टीनमध्ये प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याच्या तक्रारींनंतर खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.


खासदारांच्या निर्देशानुसार सेंट्रल रेल्वे DRUCC सदस्य संजीव कुलकर्णी आणि शिवसेना ठाणे शहर समन्वयक प्रकाश पायरे यांनी कॅन्टीनची पाहणी केली. पाहणीत खालील गंभीर बाबी आढळून आल्या:


1.  अस्वच्छता : कॅन्टीन आणि किचन परिसर अत्यंत अस्वच्छ. FSSAI नियमांचे उल्लंघन.

2.  बाधित अन्न : मुदत संपलेली शीतपेये, किडका-सडका भाजीपाला आणि वारंवार वापरले जळके तेल वापरात.

3.  इतर गैरसोय : पंखे बंद असल्याने उकाडा, कोंदट वातावरण आणि दुर्गंधी.

4.  जबाबदारीचा अभाव* : तपासणीच्या वेळी कंत्राटदार किंवा व्यवस्थापक उपस्थित नव्हते.


ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत खासदार म्हस्के यांनी संबंधित कंत्राटदारावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याची आणि कारवाई अहवाल लवकरात लवकर सादर करण्याची सूचना केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत