flowers

मनोज प्रधान यांच्याकडून फाईल्सच्या ऑडिटची मागणी




ठाणे - ठाणे महानगर पालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेली आग ही खरंच लागली होती की लावली होती? असा सवाल करून जळालेल्या फाईल्सचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली. 


ठाणे महानगर पालिकेच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या शहर विकास विभागातील एका दालनाला सोमवारी पहाटे आग लागली. या ठिकाणी मनोज प्रधान आणि नगरसेवक यासीन कुरेशी यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 


प्रधान म्हणाले की, ठाणे महानगर पालिकेतील सर्वाधिक वादग्रस्त असलेला विभाग म्हणजे शहरविकास! या विभागाला साधारणपणे दहा वर्षांपूर्वी आग लागली होती. त्यानंतर या विभागाच्या कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले होते. 26 एप्रिल 2026 रोजी मुंब्रा येथील जुन्या प्रभाग समितीला लागलेल्या आगीत जुने दस्तावेज जळून खाक झाले होते, आता पुन्हा आग लागली आहे. ही आग लागली होती की लावली होती,  हा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या आगीची त्रयस्थांमार्फत चौकशी करावी; ज्या फाईल्स जळाल्या आहेत, त्यांचे ऑडिट करण्यात यावे; ठामपाच्या सर्व वास्तूंचेही फायर ऑडिट करावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. 


दरम्यान,  या संदर्भात आयुक्तांशी बंद खोलीत चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. महासभेत आमचे नगरसेवक यावर आवाज उठवतील, असेही मनोज प्रधान म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत