flowers

ठाणे गुन्हे शाखेची धडक कारवाई: बस चोरट्यांची गँग गजाआड, 52 लाखांचा मुद्देमाल हस्तगत


ठाणे पोलीस आयुक्तालयाचे परीसरात जबरी चोरी व प्रवाशांच्या मौल्यवान वस्तुंचे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने, सदरचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी मा. वरीष्ठांच्या सुचना व आदेशानुसार गुन्हे शाखा, घटक - १, ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र प्रयत्न करुन जबरी चोरी करणाऱ्या व बसमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तु चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळीस अटक केली आहे.

त्यामध्ये जबरी चोरी व इतर चोरी करणारे आरोपीत १) सउद सिराज खान उर्फ सउद काल्या, वय २५ वर्षे, राह. देवरीपाडा, आदिवाशी गाव, झोपडपटटी, कौसा, मुंब्रा, ठाणे. २) स्वप्नील हरिष माधवानी उर्फ बाबु खरखटया, वय २० वर्षे, राह. विजयदिप चाळ, झाकीर किराणा स्टोअर जवळ, शांती मफतलाल झोपडपटटी, कळवा पुर्व, ठाणे. यांना व बस प्रवासा दरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तुंची चोरी करणारे महिला आरोपी १ ) संगीता दशरथ पीठकर, वय ४५ वर्षे, रा. ठि. रू नं ४०५, दत्तकृपा सोसायटी, वडारवाडा, अपना बाझार जवळ, मुलुंड पश्चिम, मुंबई. मुळगाव रामनगर, सोलापुर २) सुरेखा बजरंग गायकवाड, वय ४७ वर्षे, राह. परशुराम चाळ, राजे इंडस्ट्री, गवाण पाडा, मुलुंड पश्चिम, मुंबई. मुळगाव रामनगर, सोलापुर यांना अटक करुन त्यांच्याकडुन ५२,३४,१००/- रु किमतीचे ३२ तोळे सोन्याचे दागिने, ५ मोटारसायकल, १ अग्नीशस्त्र १ जिवंत काडतुसह, १ धारधार चाकु हस्तगत करण्यात आले असुन, नमुद आरोपीत यांचेकडुन ठाणे, मुंबई, नवी मुंबई व पुणे पोलीस आयुक्तालयात केलेले २४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. नमुद आरोपींपैकी सऊद सिराज खान याचेविरुध्द एम. पी. डी. ए. अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. परंतु सदर आरोपीत हा मिळुन येत नसल्याने त्याचेविरुध्द मा. न्यायालयाने प्रोक्लेमेशन ऑर्डर काढलेली होती. सदर आरोपीतास पकडण्यात गुन्हे शाखेस यश आले आहे.

सदरची कामगिरी सदरची कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त, गुन्हे, श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री अमरसिंह जाधव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे शाखा, ठाणे श्री. शेखर बागडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चि गायकवाड, पो.उप निरीक्षक प्रकाश शिरसाठ, पोहवा / अविनाश पाटील, पोहवा / संदिप महाडिक, पोहवा/धनंजय आहेर, पोहवा / मुकुंद आव्हाड, पो. हवा. / नंदकुमार पाटील, पोशि/ अमोल ढावरे, पोशि/ प्रशांत लवटे, पोशि/सागर सुरळकर, चालक पोहवा / शशिकांत सावंत, म. पोहवा. / मलीका बहीरम, मपोहवा / दिपाली जाधव यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत