Folowers

ठाणे पोलिसांची मोठी कारवाई: 39 कोटींचे 600 किलो अंमली पदार्थ जाळून नष्ट


जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त 'नशामुक्त भारत' अंतर्गत 112 गुन्ह्यांतील गांजा, MD, चरस, कफसिरपचा नाश


ठाणे, 26 जून 2026: 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत 26 जून जागतिक अंमली पदार्थ दिनाचे औचित्य साधून ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांत जप्त केलेला 39.03 कोटी रुपये किंमतीचा व सुमारे 600 किलो वजनाचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला.

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार ठाणे आयुक्तालयातील 112 गुन्ह्यांतील मुद्देमाल तळोजा MIDC, नवी मुंबई येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत जाळून नष्ट करण्यात आला. 

नष्ट केलेला मुद्देमाल:

अंमली पदार्थ गुन्हे.   जप्त वजन किंमत

गांजा 66 564 किलो 674 ग्रॅम ₹1.13 कोटी

हायब्रिड गांजा 02 855 ग्रॅम ₹85.50 लाख

MD 29 6 किलो 715 ग्रॅम ₹13.43 कोटी

चरस 10 20 किलो 982 ग्रॅम ₹20.98 कोटी

कफसिरप 4 1467 बॉटल्स ₹20.80 लाख

ब्राउन शुगर 01 104 ग्रॅम ₹2.93 लाख

एकूण 112  594 किलो 332 ग्रॅम + 1467 बॉटल ₹39.03 कोटी

केंद्रीय मुद्देमाल नाश समितीचे अध्यक्ष पोलीस सह आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, सदस्य DCP अमरसिंह जाधव, DCP मीना मकवाना व ACP विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा साठा नष्ट केला



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत