Folowers

ठाणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी: 21 घरफोडी उघड, सराईत आरोपीसह 38.5 लाखांचा मुद्देमाल जप्त


UP मधून अटक केलेला राजेश राजभर टोळीचा पर्दाफाश; ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये दहशत


ठाणे, 22 जून 2026: ठाणे शहरात वाढलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालत कल्याण गुन्हे शाखा, घटक-3 ने मोठी कारवाई केली आहे. डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या समांतर तपासातून तब्बल 21 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत 38 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कशी झाली कारवाई:

विष्णुनगर पो. ठाणे गु.र.नं. 159/2026 चा तपास करताना CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी *राजेश अरविंद राजभर, वय 30* याला उत्तरप्रदेशातील आजमगढ येथून ताब्यात घेतले. तो मूळचा आजमगढचा असून सध्या कुंभारखानपाडा, डोंबिवली पश्चिम येथे राहत होता.


चौकशीत राजेशने ठाणे आयुक्तालय, नवी मुंबई, पालघर, ठाणे ग्रामीण भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम त्याने पहिली पत्नी व भाऊ *राकेश अरविंद राजभर, वय 32* यांच्याकडे ठेवले होते. दोघांकडून एकूण 38.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सराईत गुन्हेगार:

आरोपी राजेश राजभर सराईत असून त्याच्यावर ठाणे आयुक्तालय, ठाणे ग्रामीण व रायगड परिक्षेत्रात यापूर्वीच 33 गुन्हे दाखल आहेत.

उघडकीस आलेले 21 गुन्हे:

विष्णुनगर, टिळकनगर, नारपोली, नौपाडा, कोपरी, कळवा, मुंब्रा, मानपाडा, काळसेवाडी, खडकपाडा, बदलापूर पूर्व, नालासोपारा, उरण व कल्याण तालुका पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडींचा समावेश आहे.


ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, DCP अमरसिंह जाधव, ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे व पथकाने केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत