अवैद्यरित्या अग्निशस्त्र (पिस्टल) व काडतूस जवळ बाळगणाऱ्या इसमास खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी केले जेरबंद
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर येथील सपोनि/कापडणीस, पोहवा/1834 शैलेश शिंदे, पोशि/3213 संतोश वायकर पोशि/1984 अरविंद शेजवळ, पोना/7079 सुमित मधाळे असे 08/05/2026 रोजी परिमंडळ 05 मधील कापूरबावडी पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेणेकामी पेट्रोलींग करीत असतांना *पोहवा/1834 शैलेश शिंदे* यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे श्री. शैलेश साळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरील पोलीस पथकाने काल्हेर ते ठाणे सार्वजनिक रोडवर, न्यु कशेळी ब्रिज जवळ, ठाणे प. या ठिकाणी सापळा रचून आरोपी मोगेश सुनील म्हात्रे वय 32 वर्ष रा.महादेव बिल्डिंग रूम न.301, म्हात्रे जोशी आळी, काल्हेर, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे यास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात बेकायदेशीररित्या 1 गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व 1 जिवंत काडतूस असे 30,200/- रूपये किंमतीचा माल मिळून आला आहे. त्याचेकडे अग्नीशस्त्राचे परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याचेकडे कोणताही वैद्य परवाना नसलेबाबत सांगीतले आहे. तसेच त्याने मा. पोलीस सह आयुक्त साो, ठाणे शहर यांचेकडील मनाई आदेश क्रमांक/विशा/ससाक/मनाई आदेश/9/2026 दिनांक 30/04/2026 अन्वये 05/05/2026 रोजी 00.01 वाजता ते 19/05/2026 रोजी 24.00 वाजता पावेतो मनाई आदेश भंग केल्याने त्याचे विरूध्द कापुरबावडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 216/2026 अधिनियम 1959 चे कलम 3,25(1ब),(अ) सह महा.पो.का.कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर नमूद आरोपी यास सदर गुन्हयामध्ये दिनांक 08/05/2026 रोजी 21:38 वा. अटक करण्यात आली असून त्यास मुदतीत मा.न्यायालय,ठाणे येथे हजर केले असता मा.न्यायालय,ठाणे यांनी त्याची दिनांक 12/05/2026 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.
अटक आरोपी याचा गुन्हेगारी अभिलेख खालीलप्रमाणे आहे.
1) नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी गु.र.नं. 121/2018, भा.दं.वि.क. 302, 34 प्रमाणे
नमूद अटक आरोपी याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने पुढील तपास करीत आहोत.
जनसंपर्क अधिकारी
पोलिस आयुक्तालय, ठाणे

Post a Comment