पत्नीची अनैतिक संबंधाच्या संशयावरून हत्या करणाऱ्या आरोपी पतीस तात्काळ अटक
ठाणे:८ मार्च रोजी सकाळी १०:०० वा. ते १० मार्च रोजी सकाळी ११:४० वा.चे दरम्यान कालावधीत सर्व्हे नं. ६९, पिंपरी गांव, डायघर, जि. ठाणे येथील शेतकरी रामचंद्र कोडींबा सकपाळ यांचे भात शेतात महापे, नवी मुबंई येथील साई प्रसाद स्नॅक्स सेंटर नावाचे कॅटींनमध्ये वेटरचे काम करणारा इसम नामे प्रकाश बिसा, वय ४० वर्षे, रा. हसनगंज, उत्तर प्रदेश यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कोणत्यातरी अज्ञात हत्याराने प्रकाश बिसा याचे डोक्यावर गंभीर दुखापत करून त्याचा खुन केला म्हणून हॉटेल मालक जितेंद्र उत्त्म पाटील रा.वडवली (खुर्द) कल्याण याचे तक्रारी वरून शिळ डायघर पोलीस ठाण्यात गु. रजि.नं. १३१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), प्रमाणे १०/०३/०२६ रोजी अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीरामपोल पौळ यांनी आरोपीचा शोध तपासकामी अधिनस्त अधिकारी / अंमलदार यांचे दोन तपास पथके तयार केली. गुन्हयाचा तपास चालू असताना गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक तपासाच्या आधारे आरोपीचा कसोशीने शोध घेवुन सदर गुन्हयात आरोपी नामे रामराव दासु जाधव वय. ३९ वर्षे, व्यवसाय - बिगारी काम रा. शिळगांव, ठाणे. येथून ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता आरोपी याची पत्नी सौ. शोभाबाई जाधव हिचेशी मयत इसम प्रकाश बिसा, याचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपीस संशय आल्याने सदर गोष्टीचा राग मनात धरुन आरोपीताने इसम प्रकाश बिसा यास दारु पिण्यासाठी जाण्याचा बहाना करुन मयतास पिंपरी गाव येथील सर्व्हे नंबर - ६९ मधील भाताचे शेतात घेवुन जावुन त्याचे डोक्यावर लोखंडी हातोडा मारून त्यास जीवे ठार मारले असल्याची कबुली दिलेली आहे. अशा प्रकारे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करुन सदर गुन्हयातील आरोपीचा सदर गुन्हयात ४ तासात हत्यारांसह अटक करुन खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून स्तुत्य अशी कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी सुभाषचंद्र बुरसे पोलीस उप आयुक्त परि. १ ठाणे, श्रीमती प्रिया डमाळे सहा. पोलीस आयुक्त कळवा विभाग, श्रीराम पौळ वपोनि शिळ-डायघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजेंद्र राऊत, सपोनि प्रशांत खरात, अनिल राजपुत, योगेश लामखडे, शहाजी शेळके, संतोष चव्हाण, पोउपनिरी/अजय तिडके, सहा. पोउपनिरी/ सांवत, पोह/ अर्जुन जुवाटकर, महेंद्र लिंगाळे, रमेश पाटील, विश्वास मोटे, तेजस परब, विकांत कांबळे, सचिन कोळी, शामकुमार राठोड, पोना / मंदार यादव, महेंद्र पाटील, विजय सपकाळे, समधान माळी (तांत्रिक मदत), पोशि/ रत्नदीप चौधरी, अक्षय पाडळे, संदीप बोरकर, वाहीद तडवी, ललित महाजन, युवराज गोरे, जयेश येळवे, विजय खाडे, सुशिल पवार, शरद फुकळे, अकुंश चौगुले, राहुल सुरवाडे, विनायक भस्मे ! मपोशि/ अलका चव्हाण यांनी केलेली आहे.
,

Post a Comment