प्रभाग क्रमांक १३ मध्ये महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहीमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. माझा परिसर मी स्वच्छ ठेवून ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करणार अशी शपथ घेवून या ज्ञानेश्वर चौक येथून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
या मोहिमेत स्थानिक नगरसेवक अनिल भोर, स्थानिक नगरसेविका निर्मला कणसे, वर्षा शेलार, शहाजी खुस्पे, उपायुक्त दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेदरम्यान ज्ञानेश्वर नगर चौक ते मराठा सर्कल, ज्ञानेश्वर नगर ते नितीन सिग्नल, नितीन ते कोरम मॉल, नितीन ते पप्पू ढाबा, देव शोका ते आरोग्य केंद्र सिध्दीविनायक चौक ते आनंद साळवी (हनुमान डेअरी), समतानगर व वैतीवाडी 2, आतील परिसर तसेच दर्या सागर हॉटेलपर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच ज्ञानेश्वर नगर सर्कल ते आतील परिसर, पप्पू ढाबा ते पाइपलाइन-हजुरी शौचालय पर्यंत, भुयारी मार्ग व नितीन सर्कल तसेच ज्ञानेश्वर नगर सर्कल ते नाना नानी पार्क रोड नं33 लगत या भागांमध्येही स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत कचरा उचलणे, रस्ते स्वच्छ करणे, गटारे व नाले साफ करणे तसेच कचरा हटविण्याची कारवाई करण्यात आली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका दैनंदिन साफसफाई करत असतेच याचबरोबर नागरिकांनी देखील महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.

Post a Comment