flowers

हिंद दी चादर या उपक्रमांतर्गत ठाण्यातील गुरुद्वारात आरोग्य शिबिराचे आयोजन

 


ठाणे: हिंद दी चादर या उपक्रमांतर्गत श्री गुरूतेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या निमित्ताने आज ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने ठाण्यातील गुरुद्वारात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.


     या शिबिरास ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, माजी नगरसेवक गुरुमुखसिंग स्यान उपस्थित होते.


     हे आरोग्य शिबिर ठाण्यातील तीन हात नाका येथील द्रुतगती मार्गालगत असलेल्या गुरुद्वारात पार पडले. शिबिरामध्ये नागरिकांसाठी रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी तसेच प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या सीख बांधवांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करणे व वेळेत तपासणी करून आजारांचे निदान व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.


     हिंद दी चादर या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबविले जात असून, अशा उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांना थेट लाभ मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत