मेट्रो कारशेड चा मोबदला द्या अन्यथा रस्त्यावर उतरू,घोडबंदर मोघरपाडा मेट्रो कारशेड बांधितांचा आक्रोश
प्रतिनिधी,ठाणेः- ठाणे शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रो चे जाळे झपाट्याने पसरत आहे.याच मेट्रो च्या कारशेड साठी ठाण्यातील मोघरपाडा कारशेड ची जागा निश्चित करण्यात आली आहे परंतु या मोघरपाडा कारशेड च्या प्रस्तावित जागेत सध्यास्थितीत भातशेती होत असुन स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला सरकार ने कागदावरच दिला असुन त्या कारशेड च्यी विरोधात शेतकऱ्यांनी आज शेतबांधावर ठिय्या मांडला व चुल पेटवुन या ठिकाणी जर आम्हाला योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही शेती देणार नाही यावर आमचा रोजगार आहे वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.तर शेतात चुल पेटवुन आणि ट्रक्टर फिरवून सरकार चा निषेध व्यक्त केला आहे.मुलांना नोकरीत प्राधान्य द्या ५ एकर जमिनीवर शाळा कॅालेज बांधा व मेट्रो मध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन १०० टक्के स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी किरण रामकृष्ण पाटील, संजय पाटील, निखिल ठाकूर आणि ग्रामस्थांनी केली.

Post a Comment