व्यवसायसुलभतेच्या दिशेने ‘अर्थपूर्ण वाटचाल’
भारतीय जनता पार्टी, कोपरी मंडलतर्फे GST सुधार संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘NEXT GEN GST REFORM’ अभियानाचा हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.
या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून कोकण पदवीधर आमदार मा. निरंजनजी डावखरे साहेब उपस्थित होते. यावेळी एडवोकेट हेमंतजी म्हात्रे, माजी नगरसेविका रेखाताई पाटील, शहर उपाध्यक्ष राजेशजी गाडे, मच्छीमार सेल अध्यक्ष अमरीशभाऊ ठाणेकर, विकी टीकमानी, शामकांत आनेराव, विद्याताई कदम, श्रुतिकाताई कोळी मोरेकर, तसेच कोपरी मंडल जीएसटी प्रमुख विनोद टीकमानी व मंडल अध्यक्ष श्री. कृष्णाजी भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मा. आमदार निरंजनजी डावखरे साहेबांनी जीएसटी सुधारांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर राज्य शासनाने घेतलेला दुकाने 24 तास खुले ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय व्यापाऱ्यांना जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे व्यापारी वर्गामध्ये दिवाळीपूर्वीच उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी “आत्मनिर्भर भारत” या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेनुसार “हर घर स्वदेशी” या उदात्त ध्येयाला बळकटी देण्यासाठी उपस्थित व्यापारी व नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचा संकल्प करीत शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी मंडल अध्यक्ष श्री. कृष्णाजी भुजबळ यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमदार मा. निरंजनजी डावखरे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment