ठाणे मध्यवर्ती कारागृहात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त भक्तियोग कार्यक्रम
ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने कारागृहात घंटाळी मित्र मंडळ, ठाणे यांच्या सौजन्याने मराठी भक्तियोग विशेष भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान मराठी संत साहित्यातील भजनांच्या माध्यमातून भक्ती, नैतिकता आणि जीवनमूल्यांचा संदेश दिला गेला. भजनांच्या सुमधुर सुरावटींनी संपूर्ण परिसर भारावून गेला आणि उपस्थित बंदीजनांमध्ये शांतता, प्रेरणा आणि आनंदाचा संदेश पोहोचविण्यात आला. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित हा भजन कार्यक्रम बंदीजनांसाठी अध्यात्मिक व सांस्कृतिक उर्जेचा स्रोत ठरला. ठाणे मध्यवर्ती कारागृहात होत असलेल्या अशा उपक्रमांमुळे समाजसुधारणेचा आणि आत्मविकासाचा मार्ग दृढ होत असल्याचे सर्व उपस्थितांनी नमूद केले.कार्यक्रमात घंटाळी मित्र मंडळ, ठाणे संस्थेचे पदाधिकारी
श्री. श्रीकृष्ण म्हसकर, श्री. यशवंत जोशी, श्री. श्रीनिवास मोकाशी, श्रीमती ज्योत्स्ना गोगटे, श्रीमती नंदिनी गोदे, श्री. नरेंद्र राजगोर, आणि श्री. सतीश मांदुस्कर उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमावेळी कारागृह अधीक्षक श्रीमती राणी भोसले, अति. अधीक्षक श्री. राजाराम भोसले, तसेच वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. कैलास भवर व श्री. संदीप सरपते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभारप्रदर्शन श्री. लक्ष्मण साळवे, शिक्षक यांनी केले.मराठी भाषेचे अभिजातत्व, संतसाहित्याचा वारसा आणि कारागृहातील सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित केले गेले.

Post a Comment