ठाणे मध्यवर्ती कारागृहातील प्रतिक्षालयात बंद्यायांच्या नातेवाईकांसाठी आर.ओ. वॉटर कुलरची व्यवस्था
ठाणे,प्रतिनिधी : ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यांच्या मुलाखतीसाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या प्रतिक्षालयात इनरव्हील क्लब ऑफ ठाणे वेस्ट यांच्या सौजन्याने आर.ओ. वॉटर कुलर दान देण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन आज दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले.
या प्रसंगी इनरव्हील चेअरमन श्रीमती लक्ष्मी सिंग, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. कुमार केवलरमाणी, रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्टचे अध्यक्ष श्री. संतोष कदम, तसेच इनरव्हील क्लब ऑफ ठाणे वेस्टच्या अध्यक्षा श्रीमती सुखी कोपरकर हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी अति. अधीक्षक श्री. राजाराम भोसले, उप अधीक्षक श्री. विलास कापडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. कैलास भवर, उपस्थित होते.
आर.ओ. वॉटर कुलरमुळे कारागृहात येणाऱ्या बंद्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, या सामाजिक उपक्रमाबद्दल कारागृह प्रशासनाने इनरव्हील क्लब ऑफ ठाणे वेस्ट यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.

Post a Comment