वसंत विहार शाळेच्या गौरवात मानाचा तुरा
U-14 मुलींच्या CISCE भारतीय संघात वसंत विहार शाळेच्या पाच मुलींचा समावेश
मुंबई - नुकत्याच उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या CISCE नॅशनल क्रिकेट स्पर्धेत मुलींच्या अंडर 14 महाराष्ट्र संघात वसंत विहार शाळेच्या तब्बल नऊ मुली खेळल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र संघ फायनल मध्ये पोहचत उप विजेता ठरला होता. आता यामधीलच वसंत विहार शाळेच्या तब्बल पाच मुलींची या अंडर 14 भारतीय संघात वर्णी लागली आहे. त्यामुळे वसंत विहार शाळेच्या गौरवात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पराक्रमामुळे वसंत विहार शाळेचे कौतुक होत असून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शालेय क्रिकेटमध्ये महत्त्वाची समजली जाणारी CISCE नॅशनल क्रिकेट स्पर्धा नुकतीच उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथे पार पडली. यात 14 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने फायनल पर्यंत बाजी मारत उप विजेते ठरले. या महाराष्ट्र संघात वसंत विहार शाळेच्या तब्बल नऊ मुली सिलेक्ट झाल्या होत्या. त्यानंतर या स्पर्धेत खेळलेल्या देशभरातील संघांमधून महाराष्ट्र संघातील आठ मुली या भारतीय संघात सिलेक्ट झाल्या आहेत. यातील पाच मुली या मुख्य संघात आहेत तर तीन मुली या स्टँड बाय म्हणून निवड झाली आहे.
तर महाराष्ट्र संघातील या आठ मुलींपैकी पाच मुली या वसंत विहार शाळेच्या आहेत. या पाच मधील देलिशा आंगचेकर, जिया भन्साळी आणि रिशा वैद्य या तिघांची मुख्य संघात निवड झाली असून भुवि जाधव आणि आराध्या थोरवे या दोघींची स्टँड बाय म्हणून वर्णी लागली आहे.
CISCE टुर्नामेंटसाठी 14 वर्षाखालील मुलींच्या भारतीय संघात ठाण्यातील वसंत विहार शाळेच्या पाच मुली सिलेक्ट झाल्याने देशात ठाण्याचे नाव मोठे झाले असून वसंत विहार शाळेचे नावलौकिक झाले आहे.
याचे सारे श्रेय गोयंका शाळा व्यवस्थापना बरोबर वसंत विहार शाळेच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक किरण साळगावकर आणि त्यांच्या टीमचे असल्याचे सांगितले जात असून श्री साळगावकर यांच्यावर देखील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment