ठाणे जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी सक्षमीकरण कार्यालय सुरू
(जिल्हा परिषद, ठाणे) - ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ अधिक सुलभ व परिणामकारक पद्धतीने मिळावा यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्यात आले आहे. हे कार्यालय दि. ०१ सप्टेंबर, २०२५ पासून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत स्वेअरफिट होम, जीएसटी भवन समोर, वागळे इस्टेट रोड क्र. २२, ठाणे – ४००६०४ येथील तळमजल्यावर कार्यान्वित करण्यात आले आहे.
या कार्यालयामार्फत दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, लाभ मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच समस्या निवारणासाठी सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी उपक्रमांचा योग्य लाभ घेता यावा, हा या कार्यालय स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी उज्वला सपकाळे यांनी सांगितले की, "दिव्यांग बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे सर्व दिव्यांग नागरिकांनी या कार्यालयाशी संपर्क साधून लाभ घ्यावा."
000

Post a Comment