शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची दिल्लीतील सूचना भवन कार्यालयाला भेट
पत्रकारांच्या प्रश्नांविषयी केली अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याशी चर्चा
ठाणे - प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया पार्लमेंटरी कमिटीचा सदस्य म्हणून शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीतील सूचना भवन कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना देसाई यांची भेट घेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर नरेश म्हस्के यांनी सविस्तर चर्चा केली.
पत्रकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता कोणत्या योजना आखल्या पाहिजेत, काय सुविधा पुरवल्या पाहिजेत या विषयी भेटी दरम्यान चर्चा झाली. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याशी चर्चा करून नरेश म्हस्के यांनी घेतली.
आपल्या देशातील पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. देशातील लाखो पत्रकार, संपादक, वृत्तपत्र संस्था आणि वृत्तवाहिन्या जनतेपर्यंत सत्य पोहोचवण्याचे काम करत आहेत. पण त्याचवेळी या क्षेत्रात काम करणाऱ्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत, त्यांना कोणत्या सुविधा मिळू शकतात, याचा सखोल विचार होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या सर्व विषयांवर न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याशी खासदार नरेश म्हस्के यांनी धोरणात्मक आणि विधायक चर्चा केली.
Post a Comment