वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे साहेब याचा मदतीचा हात


वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे साहेब याचा मदतीचा हात, सामान्य नागरिकांना आनंदाचा क्षण, का ते वाचा नक्की पुढे.


 सावरकर नगरात शेट्टी व इंगळे यांच्या घरी चोरी झाली... अनेक वर्षापूर्वी म्हणजे १९९८/१९९९ मध्ये दोन चोरी सावरकर नगर भागात झाला, गुन्हेगार सापडले.. पण फिर्यादीच शोध कोणाला लागला नसावा..किंवा कोणी घेण्याचं अथवा कुटुंबांनी देखील परत मुद्देमाल भेटेल म्हणून दखल घेतली नसावी.


  आपले कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे साहेब यांनी मुद्देमाल विभागात असणारा अधिकारी सोबत चर्चा केली जर फिर्यादी कोर्ट ऑर्डर घेऊन येत नसेल, तर आपण जनतेचे सेवक आहोत, आपण शोध घ्या आणि ३० वर्षा पूर्वी झालेल्या चोरीची फिर्याद देणारी, व्यक्ती याचा शोध घ्यायला माझा सोबत हवालदार श्री संदीप सपकाळे सर आणि हवालदार फिरोज सय्यद सर ह्यांनी दोन दिवस सपूर्ण सावरकर नगर मधील जुन्या व्यक्ती सोबत संवाद करून माहिती घेत होतो, ह्या वेळी माझ्या लक्षात आले की एक फिर्यादी उषा शेट्टी आहेत त्यामुळे त्याचा शेट्टी समाजच, सौ पौर्णिमा अमीन ताईना मी संपर्क केला, त्यांनी सांगितले सदर व्यक्ती ऐरोली येथून स्थलांतरित होत, पनवेल येते राहत असल्याचे कळले, नक्की हीच व्यक्ती आहे ह्याची खात्री जमा केली, तिथला संपर्क करत त्यांना विचारणा केली आणि पहिला फिर्यादी भेटला.. थोडस बर वाटल.. पण एक फिर्यादी च शोध बाकी होता, आता झाले असे.

दुसरा फिर्यादी ह्यांनी रूम देखील १२ वर्षा पूर्वी विकली, पण त्यांना दोन मुली आहेत असे कळले, पोलिस म्हटलं तर चांगला काम असेल तरी लोक मदत करत नाही.. पण लोकांनी एकच सांगितल फिर्यादी दोन्ही नवरा बायको मयत आहे तुम्ही शोधा.


अशात एक जेष्ठ व्यक्ती मी स्थानिक असल्याने माहिती देण्यास तयार झाला, त्याने सांगितलं त्याच मुलीच नंबर आहे, तुम्ही खरच सोन परत करत आहात तर मी तुम्हाला नंबर देतो.. आता माझा व पोलिसाच नंबर अनोळखी असल्याने मुलगी फोन उचलत नव्हती, शेवटी एक साधा मेसेज केला आणि त्यात झालेला चोरी ची माहिती सांगितली, तेव्हा मुलीने फोन केला तिला पोलिस स्टेशन ल बोलवून विश्वास दाखवला आणि आज २१/०८/२०२५ रोजी सोन परत करण्याचं आनंदच क्षण आला...


बघा १९९८/९९ ते २०२५ पर्यंत कित्येक काळ पुढे सरकला पण विचारच संवेदनशीलपणा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे साहेब ह्यांनी दाखवला व दखल घेतली आणि सोन परत करता आले... अशा संवेदनशील पोलिस अधिकारी सोबत काम करताना आनंद वेगळा आहे.


आई वडील मयत झाले पण त्याची पुण्याई म्हणून मुलीनं त्याच आधार म्हणून आशीर्वाद रुपी सोन परत करता आले..


आणि शेट्टी ताई ना उतरत्या वयात आधार म्हणून सोन परत करता आले.


मला पोलिस मित्र म्हणून हे समाधान वाटते ही देखील समाजसेवा करण्याचं खारीचा वाटा पोलिस वरिष्ठ अधिकारी श्री  राजकुमार वाघचवरे साहेब आणि सहकारी हवालदार श्री संदीप सपकाळे साहेब व हवालदार फिरोज सय्यद साहेब याचा मुळे मिळाला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत