महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या २४ ऑगस्टच्या ठाण्यातील कार्यकर्ता संस्कार शिबिराची नोंदणी सुरु
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखेच्या वतीने ठाण्यातील मो ह विद्यालयात, रविवारी, २४ ऑगस्ट २०२५ रोजी, दिवसभराचे 'कार्यकर्ता संस्कार शिबिर' आयोजित करण्यात आले असून याची नोंदणी सुरु असल्याची माहिती कार्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर व प्रधान सचिव अशोक मोहिते यांनी दिली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखेच्या वतीने कार्यकर्ता संस्कार शिबीर, रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, ठाण्यातील मो. ह. विद्यालय, स्टेशन रोड, ठाणे (प.), येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन नाॅलेज पार्क फॉर रूरल डेव्हलपमेंटचे सचिव व शेतकरी सेवा संघाचे महासचिव देवेंद्र जोंधळे यांच्या हस्ते होईल तर या शिबिरात, 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर डाॅ. सुषमा बसवंत, 'मन व मनाचे आजार' या विषयावर प्राचार्य मच्छिन्द्रनाथ मुंडे, 'अंनिस ची पंचसूत्री' या विषयावर राजेश देवरुखकर, 'चमत्कारामागील विज्ञान (प्रात्यक्षिकांसह)' या विषयावर प्राचार्य मच्छिन्द्रनाथ मुंडे, 'अंनिसची व्यापक वैचारिक भूमिका' या विषयावर सुशीला मुंडे हे वक्ते आपली मते व्यक्त करतील. या शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरु असून यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर (९५९४६ ७९९२६) व प्रधान सचिव अशोक मोहिते (९९६७४ ४३८११) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिसतर्फे करण्यात येत आहे.
Post a Comment