ठाणे व परिसरातील पहिली AI इंटिग्रेटेड 5G स्मार्ट अॅम्ब्युलन्स लाँच
मेड्युलन्ससोबतच्या भागीदारीतून किम्स हॉस्पिटल, ठाणेकडून लोकार्पण
ठाणे : किम्स हॉस्पिटल्स, ठाणे यांनी मेड्युलन्ससोबतच्या भागीदारीतून ठाणे प्रांतातील पहिल्या AI-इंटिग्रेटेड 5G स्मार्ट अॅम्ब्युलन्सच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या रूपाने आपत्कालीन आरोग्यसेवेमधील एका लक्षणीय दिशादर्शक उपाययोजनेची आज घोषणा केली. ही अद्ययावत अॅम्ब्युलन्स व्यवस्था AI तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णावर हरक्षणी देखरेख ठेवण्याची सुविधा आणि अखंडित 5G कनेक्टिव्हिटी पुरवित हॉस्पिटलात दाखल होण्यापूर्वीच्या अतिदक्षता देखभालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे.
किम्स हॉस्पिटल्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद व प्रात्यक्षिकादरम्यान झालेल्या अनावरणामध्ये या स्मार्ट अॅम्ब्युलन्सची वाटेमध्ये असताना रुग्णाशी संबंधित ECG, रक्तदाब आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनसह महत्त्वाच्या निदर्शकांची आकडेवारी इमर्जन्सी रूमकडे थेट (लाइव्ह टू इमर्जन्सी रूम) संक्रमित करण्याची क्षमता प्रदर्शित करण्यात आली. सर्वत्र आढळणाऱ्या 5G सुसज्ज अॅम्ब्युलन्स व या अॅम्ब्युलन्समधील फरक म्हणजे ही नेक्स्ट-जनरेशन यंत्रणा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रवासादरम्यान रुग्णाच्या तब्येतीच्या महत्त्वाच्या निदर्शकांची सातत्याने चिकित्सा करत राहते, ज्यामुळे आपत्कालीन सेवेतील डॉक्टरांना रुग्ण हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच त्याच्यावरील उपचारांच्या प्रोटोकॉल्सना सुरुवात करता येते.
“आघात, कार्डिअॅक अरेस्ट किंवा स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये गोल्डन अवर म्हणजे जीवन व मृत्यूमधील अंतर ठरू शकतो.” किम्स हॉस्पिटल्स, ठाणेमधील इमर्जन्सी मेडिसीन विभागाचे एचओडी डॉ. अंकित बियानी म्हणाले. “आमच्या AI-इंटिग्रेटेड 5G स्मार्ट अॅम्ब्युलन्सची साथ असल्याने रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आधीच त्याच्यावरील उपचारांबद्दलचे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु करता येऊ शकते – ज्यातून आपत्कालीन सेवेमध्ये वेळच्यावेळी हस्तक्षेप म्हणजे काय याची नवी व्याख्या घडू शकते.”
किम्स हॉस्पिटल्स, ठाणेचे रिजनल सीओओ सौरभ गुप्ता पुढे म्हणाले: “या सेवेचा शुभारंभ म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत गाठलेल्या एका मैलाच्या टप्प्याहून खूप काही आहे – यात रुग्णाला प्राधान्य देणाऱ्या नवसंकल्पनांप्रती आमची सखोल बांधिलकी प्रतिबिंबित झाली आहे. 5G कनेक्टिव्हिटी व AI क्षमतांना एकत्र आणत, आपत्कालीन प्रतिसादाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्याचे व ठाणे व महाराष्ट्रातील लोकांसाठी अतुलनीय वैद्यकीय सर्वोत्कृष्टतेच्या माध्यमातून अधिक प्राण वाचविणारी सेवा पुरविण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.”
किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील डॉ. अमित राओदेव, प्रमुख क्रिटिकल केअर यांनी कार्डिअॅक प्रकरणांमधील त्याच्या निर्णायक मूल्यावर भर दिला, “हृदयाशी संबंधित आपत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. AI संचलित स्मार्ट अॅम्ब्युलन्स रुग्ण आमच्यापर्यंत पोहोचण्याच्याही आधी त्याच्या प्रकृतीची सुस्पष्ट चिकित्सात्मक माहिती पुरवित उपचार निश्चित करण्यासाठी अधिकचा वेळ देते व त्यातून रुग्णाचे दीर्घकालीन नुकसान टळून तो बरा होऊ शकेल इतका फरक पडू शकतो.”
रिअल-टाइम टेलिमेट्री, AI वर आधारित माहिती विश्लेषण आणि संपर्काची HD साधने अल्ट्रा-लो-लेटन्सी असलेल्या अत्यंत वेगाने प्रतिसाद देणाऱ्या 5G नेटवर्क्सबरोबर कशाप्रकारे विनाखंड काम करू शकतात हे उपस्थितांनी प्रात्यक्षिकामध्ये पाहिले. ही यंत्रणा इमर्जन्सी टीम्सना अॅम्ब्युलन्समधील कर्मचारीवर्गाशी संवाद साधण्याची सुविधा पुरविते, आकडेवारीचा हरक्षणी फेरआढावा घेऊ देते व त्यानुसार इमर्जन्सी बे सज्ज ठेव शकते, ज्यातून ‘गोल्डन अवर’चा जास्तीत जास्त फायदा घेतला जातो.
या सेवेच्या शुभारंभामुळे किम्स हॉस्पिटल्स संपूर्णपणे AI-इंटिग्रेटेड 5G स्मार्ट अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करणारी ठाणे क्षेत्रातील पहिली संस्था ठरली आहे, ज्यामुळे भविष्यासाठी सज्ज आपत्कालीन औषधोपचारांच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून तिने आपले स्थान निश्चित केले आहे. मेड्युलन्ससोबत केलेल्या सहयोगामुळे चिकित्सेतील तज्ज्ञत्व आणि अद्ययावत तांत्रिक सोयीसुविधा या दोन गोष्टी एकत्र आल्या आहेत व महाराष्ट्र तसेच भारतभरातील हॉस्पिटल्ससाठी एक नवा मापदंड सिद्ध झालेला आहे.
किम्स हॉस्पिटल्स विषयी
किम्स हॉस्पिटल्स हे भारताच्या काही अग्रगण्य मल्टि-स्पेशलिटी हेल्थकेअर नेटवर्क्सपैकी एक आहे, जे आपल्या चिकित्सात्मक सर्वोत्कृष्टतेसाठी आणि रुग्णांना प्राधान्य देणाऱ्या कार्यपद्धतीसाठी सुपरिचित आहे. 30 हून अधिक मेडिकल स्पेशलिटीज आणि वेगवेगळ्या शहरांत पसरलेले कार्यक्षेत्र यांच्या साथीने किम्स आरोग्यसेवाक्षेत्रात नवसंकल्पना राबविण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. हॉस्पिटल अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाची सहृदयतेने केलेल्या देखभालीशी सांगड घालते, जेणेकरून दर्जेदार आरोग्यसेवा सहज, वाजवी दरात उपलब्ध व्हावी व परिणामांवर लक्ष केंद्रित करणारी असावी.
Post a Comment