हिंदू धर्माविषयी प्रचंड अभिमान असणाऱ्या अहिल्याबाई यांनी हिंदू धर्मातील सतीजाणे, हुंडा देणे आणि घेणे या सारख्या वाईट प्रथा मोडून काढल्या

 


ठाणे - इस्लामी संस्थेच्या विचारांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून हिंदू मंदिरांचा पुर्नजन्म करणे, त्या ठिकाणी घाट बांधणे सोपे नव्हते.काशी-  विश्वनाथ ,सोरटी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे काम ३०० वर्षांपूर्वी अहिल्यादेवी यांनी केले. हिंदू धर्माविषयी  प्रचंड अभिमान असणाऱ्या अहिल्याबाई यांनी    सती जाणे , हुंडा घेणे आणि देणे या बरोबरच  हुंड्यासाठी मध्यस्थी करणारे यांना कठोर शिक्षा या सारख्या वाईट रूढी परंपरा मोडून काढल्या. महिलांप्रती आत्मियता दाखवणाऱ्या, महिलांना महेश्वरी साडीच्या माध्यमातून नव उद्योजकतेची दिशा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. परंतू आजपर्यंत ३०० वर्षात शिवलिंग हाती घेतलेल्या अहिल्यादेवी यांचा  फोटो , मूर्ती या पलीकडे खरा इतिहास   त्यांचे समाजातील योगदान पुढे आले नाही अशी खंत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केली. 


निमित्त होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी   जयंतीनिमित्त ठाणे शहरातील बुध्दीजीवी वर्ग आणि पत्रकार यांच्या साठी कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲड.संदीप लेले,  आमदार निरंजन डावखरे,ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री आनंद कांबळे,ज्येष्ठ नगरसेवक श्री नारायण पवार, नगरसेविका मृणाल पेंडसे,प्रतिभा मढवी, संयोजक राजेश मढवी, प्रदेश प्रवक्ता सागर भदे,परीक्षित धुमे आदी उपस्थित होते.   

आज सोशल मिडिया जमान्यात राज्यकर्ते कोणताही उपक्रम राबवला की फेसबुकवर टाकून श्रेय घेण्यासाठी विसरत नाहीत.तिथे मिळकत असूनही सरकारी उत्पन्नातून   मंदिरांची पुनर्बाधणी  , पाणवठे हे  खाजगी पैशातून बांधत असताना प्रत्येक  पत्राच्या शेवटी महादेवाच्या आज्ञेवरून  असा उल्लेख असायचा.  या कामाशी माझा संबध नाही.  आपण फक्त निमित्तमात्र असल्याचे त्या सांगतात. 

 ३०० वर्षांपूर्वी स्वतः च्या लेकीचे कन्यादान करून कन्यादान कोणीही करू शकतो त्याला जेंडरचे लेबल नाही याचा वस्तूपाठ जगाला दाखवून दिला .तर स्वतःला पुरोगामी आणि भारताला प्रतिगामी म्हणणाऱ्या ब्रिटन आणि अमेरिकेत महिलांना  १९१८ ते १९२० मध्ये महिला मतदारांना मतदानाचा हक्क मिळाला. भारतात  मात्र ३०० वर्षांपूर्वी अहिल्यादेवी यशस्वी पणे राज्यकारभाराचा गाडा यशस्वीपणे हाकत होत्या असेही प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत