खासदार नरेश म्हस्के यांनी खासदारकी खाक्या दाखवल्यानतंर ठाण्यातील रेल्वे आरक्षण केंद्र सुरु

 

वर्तक नगर येथील आरक्षण केंद्रास आज खासदार नरेश म्हस्के यांनी दिली भेट 


 सध्या उन्हाळी सुट्टी सुरु झाली असुन ठाण्यातील घोडबंदर रोड,मुलुंड  आणि ठाणे पश्चिम मधील आस पास च्या नागरिकांच्या सोयीचे आरक्षण केंद्र म्हणुन वर्तक नगर आरक्षण केंद्र पाहिले जायचे .परंतु गेल्या एक महिन्या हुन अधिक दिवस हे आरक्षण केंद्र एम.टी.एन.एल आणि रेल्वे च्या वादामुळे बंद पडले होते,आरक्षण केंद्र बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता व ठाणे स्थानकात आरक्षण केंद्रात जावे लागत होते,स्टेशन परिसरात पार्किंग साठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता . याची  तक्रार नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली.खासदार नरेश म्हस्के यांनी तात्काळ हे आरक्षण केंद्र सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलली आणि रेल्वे प्रशासन व एम.टी.एन.एल यांच्यात समन्वय साधुन हे आरक्षण केंद्र  सुरु केले.खासदार की खाक्या दाखवल्यानतंर हे आरक्षण केंद्र  पुन्हा सुरु झाले. आज या आरक्षण केंद्रास खासदार नरेश म्हस्के यांनी भेट दिली .त्यांच्या सोबत शिवसेनेचे विलास जोशी ,ओवळा घोडबंदर शिवसेना शहर प्रमुख  राजू फाटक ,बाळा गवस , संजीव कुलकर्णी पदाधिकारी उपस्थित होते .आरक्षण केंद्र सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत