येऊर परिसरात राबविण्यात आली सर्वंकष स्वच्छता मोहीम
स्वयंसेवी संस्था, नागरिक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग
ठाणे -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील येऊर परिसरात आज (शनिवार दि. ०३/०५/२०२५ ) सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे (#DeepCleaningCampaign) आयोजन करण्यात आले. येऊर मधील बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उपायुक्त दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त तनुजा रणदिवे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात स्वच्छता केली जाते. त्याच जोडीला दोन वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे सर्वंकष स्वच्छता मोहीमही राबवली जाते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार येऊर परिसरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
येऊर येथील बसस्थानक परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा कचरा उचलण्यात आला. तसेच इतर भंगार साहित्य उचलून सदर भागाची साफसफाई करण्यात आली. तसेच तेथील रस्त्यांवरील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार, विभागनिहाय पध्दतीने नियोजन करण्यात आले. तसेच मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री यांचीही उपलब्धता करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी दिली.
Post a Comment