शिवाईनगर भागातील रहिवाशांना दिलासा पाण्याच्या थकबाकीबाबत लवकरच निर्णय - माजी नगरसेविका परिषा सरनाईक


मुंबई:  शिवाईनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलेल्या दंडात्मक पाणी पट्टीच्या नोटीशीला स्थगिती देण्यात आली असून पाणीपट्टीच्या बिलावरील दंड पुर्णतः माफ केला आहे. अशी माहिती ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी दिली. त्या  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याशी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने बोलत होत्या.

     त्यापुढे म्हणाल्या शिवाई नगर परिसरातील  गिरीराज सोसायटी गीतांजली सोसायटी, शिवशक्ती सोसायटी, चिन्मय सोसायटी, प्रगती सोसायटी ,ओम साई श्रद्धा सोसायटी, या म्हाडाच्या सोसायटी बरोबर श्री समर्थ सोसायटी, सहजीवन सोसायटी, , सुनीती सोसायटी ,एकरूप सोसायटी,  सोसायटी, नवदुर्गा सोसायटी, गुरुकृपा सोसायटी,  या  सोसायटीतील नागरिकांना म्हाडाच्या तथाकथित अधिकाऱ्यांनी वेटीस धरले असून २०-२२ वर्षांनंतर अचानक दंडात्मक रकमेसह थकीत पाणीपट्टीची नोटीस पाठवणे हे अत्यंत चुकीचे आहे. असे तुघलकी आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे! अशी आग्रही मागणी त्यांनी जैस्वाल यांच्याकडे केली.

    यावर बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी  दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटीस ला स्थगिती दिली असून  पाणीपट्टी वरील दंडात्मक रक्कम  पूर्ण माफ करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  याबरोबरच या सोसायटी धारकांना मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन द्वारे अथवा ठाणे महापालिकेचे पर्यंत द्वारे पाणीपुरवठा होतो यासंदर्भात सविस्तर अहवाल देण्याची निर्देश ठाणे महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सोसायटी धारकांचे मूळ बिल देखील  फेर तपासणी करून टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या ज्यांच्याकडे केवळ पाणी जोडणी आहे परंतु पाणी येत नाही अशा नागरिकांना दिलेले बिल पूर्ण माफ करण्याचे देखील आश्वासन यावेळी देण्यात आले.

       या संदर्भात ठाणे शहरातील शिवाईनगर परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना महापालिका व म्हाडाकडून दुहेरी पाणीबिलांची थकबाकी भरावी लागत असून त्यातून त्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे असे पत्र परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील नगरसेवकांचे शिष्टमंडळाने म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जैस्वाल यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारून सकारात्मक तोडगा काढल्याबद्दल माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल यांचे आभार मानले आहेत. तसेच या संदर्भातील प्रश्न भविष्यात न सुटल्यास आपला लढा यापुढे देखील चालू राहील असे नि: संदिग्ध  आश्वासन संबंधित सोसायटीच्या रहिवाशांना दिली आहे. या वेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेविका विमल भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक संजय कदम व शिवाई नगर मधील असंख्य रहिवासी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत