सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालय खाली करण्यात आली
पालघर : अनोळखी ईमेल आयडी वरून बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता .सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालय खाली करण्यात आली आहेत.
सदर ई-मेल पोलिसाकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी या बाबीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासह, प्रशासकीय इमारत अ आणि ब तात्काळ खाली करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांना अनोळखी वस्तू आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क करावा .
कोणीही अफवा पसरू नये आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवून नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले

Post a Comment