शनिवारी ठाण्यात “ अहिल्या दौड ” चे आयोजन
यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समितीच्या ठाणे शहरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समितीच्या वतीने ८ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ वाजता खास महिलांसाठी "अहिल्या दौड" आयोजित करण्यात आली आहे.अशी माहिती समारोह समितीच्या अध्यक्षा,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे यांनी दिली आहे.
बारा वर्षाच्या वरील सर्व मुली आणि महिला या दौडमध्ये भाग घेऊ शकणार असून आत्तापर्यंत ५०० पेक्षा जास्त मुली व महिलांनी या दौडसाठी नोंदणी केली आहे. ८ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ वाजता हि दौड सुरु होणार असून यामाध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जनसामन्यांपर्यंत पोहचावे हाच मुख्य उद्देश असल्याचे ॲड रुचिका शिंदे यांनी सांगितले.महाराष्ट्रात अशाप्रकारे पहिल्यांदाच अहिल्या दौडचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ठाणेकरांनी या अहिल्या दौड मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन दौड यशस्वी करावी असे आवाहन ॲड शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment