ध्वनी प्रदूषण तसेच अनधिकृत मंडपांबाबत तक्रारींसाठी महापालिकेची हेल्पलाईन
- नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन
ठाणे : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रातील ध्वनी प्रदूषण तसेच अनधिकृत किंवा अनियमित मंडप रचना यांच्याबाबत नागरिकांना तक्रार नोंदवता यावी यासाठी तक्रार निवारण प्रणाली तयार करण्यात आली आहे.
नागरिकांनी ध्वनी प्रदूषणविषयक तसेच, अनधिकृत किंवा अनियमित मंडप रचनांबाबत पुढील क्रमांक किंवा इमेलवर तक्रार करावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
- तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर - १८०० २२२ १०८
- एसएमएस आणि व्हॉट्सअप सुविधा - ७५००९४६१५५
- दूरध्वनी क्रमांक - ०२२-२५३७१०१०
- ई-मेल - rdmc@thanecity.gov.in
- pcctmc.ho@gmail.com
तरी नागरिकांनी या तक्रार प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment