8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी 8 मार्च रोती जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरीता समूह गायन, समूह नृत्य, समूह नाटिका, महिला भजन तसेच मंगळागौर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धांचे आयोजन यावर्षीही करण्यात आले आहे व त्याच्या प्राथमिक फे-याही पूर्ण झालेल्या आहेत.
या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच उकृष्ट महिला लिंक वर्कर (8 विभागातून प्रत्येकी 01), विनावेतन समाजसेवा करणा-या समाजसेविका (नवी मुंबई कार्यक्षेत्रातून 01), उकृष्ट महिला सफाई कामगार (8 विभागातून प्रत्येकी 01), अपंग व दिव्यांगाकरिता उल्लेखनीय काम करणा-या महिला (नवी मुंबई कार्यक्षेत्रातून 01), उकृष्ट महिला पोलिस कर्मचारी (नवी मुंबई कार्यक्षेत्रातून 01), नमुंमपा शिक्षण मंडळातून उकृष्ट शिक्षिका (प्राथमिक शिक्षिका - 01 आणि माध्यमिक शिक्षिका 01) तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उदयोग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिलांना आणि स्वच्छता अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था / महिला मंडळ / महिला बचत गट यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे जागतिक महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये 8 मार्च 2025 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, पुरस्कार वितरण व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त महिला / महिला मंडळे / महिला बचत गट यांनी दि. 08 मार्च 2025 रोजी, सकाळी 9.00 वा. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे जाहीर अवाहन नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास

Post a Comment