कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प


प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली माहिती



             सन 2025-26 च्या मूळ अर्थसंकल्पातील प्रमुख उद्दिष्टे :

                 कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प

                  महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

                  खर्चामध्ये वित्तीय शिस्त

                पोषक व शाश्वत पर्यावरणाकरीता उपाययोजना

                 गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची  कामे

                  महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण

                 महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर

                 प्रशासकीय कामकाजामध्ये  पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर

                  कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष

                  वृक्षगणना व वृक्षसंवर्धन 


        ठाणे (7): कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन 2024-2025 चा सुधारित 6550 कोटी तर सन 2025-2026 सालचा 5645 कोटी रूपयांचा मूळ अर्थसंकल्प आज, शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आला. नागरिकांना चांगेल जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटीबद्ध असून अर्थसंकल्पाची त्यादृष्टीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत केले.

 

         सन 2024-25 मध्ये रु. 5025 कोटी 01 लक्ष रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणी पुरवठा आकार, करवसुली, जाहिरात, व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न रु. 3454 कोटी 83 लक्ष ऐवजी रु.3220 कोटी  42 लक्ष सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणा-या अनुदानाचा विचार करता,  मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या रु. 284 कोटी  32  लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर 2024 अखेर  रु. 914  कोटी  35 लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी रु.1162 कोटी 71 लक्ष अपेक्षित केले आहे व  अमृत 2.00 योजनेसाठी रु. 20 कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते परंतु मार्च 2025 अखेरपर्यंत सदरचे कर्ज घेण्यात येणार नाही. खर्च बाजूस सन 2024-25  मध्ये महसुली खर्च रु. 3345 कोटी 66 लक्ष प्रस्तावित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकात रु.3034कोटी 77 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च रु.1679 कोटी  ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च  रु.2067 कोटी 50 लक्ष सुधारित करण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.


          या पत्रकार परिषदेस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयक्त (२) प्रशांत रोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, ठाणे परिवहन सेेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (सचिव) उमेश बिरारी व्यासपीठावर उपस्थित होते.  त्याचवेळी परिवहन उपक्रमाचे सन २०२५-२६चे ८९५ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांना ठाणे परिवहन सेेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सादर केले.


          महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत :

1)  मालमत्ता कर :

           मालमत्ता कर व फी पासून सन 2024-25  मध्ये रु. 819 कोटी  71  लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते.  डिसेंबर 2024 अखेरचे  उत्पन्न   रु. 512 कोटी 42 लक्ष  विचारात घेवून मालमत्ता करापासून  रु.776  कोटी    42 लक्ष सुधारित अंदाज करण्यात येत आहे.

           कर वसुली विभागांतर्गत मालमत्ता कराच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्याकरीता पुढीलप्रमाणे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

  मालमत्ता करासाठी संपूर्ण शहराचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामधून महापालिकेच्या महसुलामध्ये वाढ अपेक्षित आहे.

  नागरिकांना देण्यात येणाऱ्या मालमत्ता कर संलग्न लोकसेवा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा मानस आहे.

  मालमत्ता कराचे देयक, मालमत्ता कर भरणे व इतर सेवांकरिता व्हॉटस्ॲप चॅटबोट (WhatsApp Chatbot) विकसित करण्याचे नियोजन आहे.

          सन 2025-26 या आर्थिक वर्षात देखील  पहिल्या सहामाही सोबत दुसऱ्या सहामाहीचा कर भरणाऱ्या करदात्यांना पुढीलप्रमाणे सवलत/सूट असणार आहे.

अ.क्र. कालावधी दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात सवलत

1. दि.01 एप्रिल 2025 ते दि.30 जून 2025 10%

2. दि.01 जुलै 2025 ते दि.31 जुलै 2025 3%

3. दि.01 ऑगस्ट 2025  ते दि.31 ऑगस्ट 2025 2%

  सन 2025-26  मध्ये मालमत्ता कर व फीसह रु. 841 कोटी  58 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित केले आहे.

           सन  2025-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके वर्षाच्या अगदी सुरुवातीस देण्यात येणार आहेत. जेणेकरून, महापालिकेस आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस कररुपी उत्पन्न प्राप्त होईल.

2)  विकास  व तत्सम शुल्क :

 सन 2024-25  मध्ये शहर विकास विभागाकडून विकास व तत्सम शुल्कापोटी रु.750 कोटी उत्पन्न अपेक्षित केले होते. शहर विकास विभागाकडून प्राप्त झालेले डिसेंबर 2024 अखेरचे उत्पन्न रक्कम रु.385कोटी 09 लक्ष विचारात घेऊन शहर विकास विभागाकडील उत्पन्न रक्कम रु. 582  कोटी 15लक्ष सुधारित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने मेट्रो प्रकल्पासाठी विकास शुल्कापोटी रु. 157 कोटी अपेक्षित करण्यात आले होते. परंतु वाढीव विकास शुल्काची रक्कम विकासक/ वास्तुविशारद यांच्यामार्फत शासनाच्या Urban Transport Fund (UTF) मध्ये Real Time जमा करण्यात येत आहे. त्यामुळे  मेट्रो प्रकल्पासाठी विकास शुल्कापोटी जमा झालेले उत्पन्न रु. 57 कोटी सुधारित अंदाजपत्रकात अंतिम करण्यात आले आहे. 

सन 2025-26 या आर्थिक वर्षात रु. 650 कोटी 80 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित करण्यात आलेले आहे.

3)  स्थानिक संस्था कर :

 स्थानिक संस्था कर विभागाकडे वस्तू व सेवाकर अनुदानापोटी रु.1142 कोटी 42 लक्ष , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान रु.200    कोटी,  स्थानिक संस्था कराची मागील वसुली रु. 8 कोटी असे एकूण रु. 1350 कोटी 42 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले होते. शासनाकडून वस्तू व सेवाकर अनुदानाची रक्कम नियमितपणे प्राप्त होत असून डिसेंबर 24 अखेर प्रत्यक्षात रु.854 कोटी 07 लक्ष प्राप्त झाले आहेत.  मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अपेक्षित धरलेल्या अनुदानापैकी आतापर्यंत रु. 33 कोटी  98  लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु 1% मुद्रांक शुल्क अधिभाराची महापालिकेस प्राप्त होणारी रक्कम शासनाकडून अपेक्षित असल्याने सुधारित अंदाज रु. 200 कोटी अपेक्षित केले आहे.  तसेच स्थानिक संस्था कराच्या मागील थकबाकी वसुलीपोटी अपेक्षित उत्पन्नापैकी डिसेंबर 2024 अखेर  रु. 9 कोटी 17  लक्ष प्राप्त झाले असल्याने सुधारित अंदाज रु. 11 कोटी  करण्यात आले आहे.

या सर्व बाबींचा विचार करुन स्थानिक संस्था कर विभागाचे सुधारित अंदाज एकूण रु. 1353 कोटी  43 लक्ष अपेक्षित केले आहेत

तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी वस्तू व सेवाकर अनुदानापोटी रु. 1233 कोटी  79  लक्ष , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान रु. 200 कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली रु. 8 कोटी  असे एकूण रु.1441 कोटी 79  लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.

4)  पाणी पुरवठा आकार :

पाणी पुरवठा आकारासाठी सन 2024-25  मध्ये रु. 225 कोटी उत्पन्न अपेक्षित होते.यामध्ये मोठया प्रमाणात घट दिसून येत आहे. पाणी पुरवठा आकाराचे सुधारित अंदाज रु. 200 कोटी अपेक्षित केले असून सन 2025-26  मध्ये रु.250 कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे. पाणी पुरवठा आकाराच्या वसुलीसाठी विशेष मोहिम राबवून, सर्वे करुन अनधिकृत नळ कनेक्शन शोधून व दंडात्मक कार्यवाही करुन त्यांचा नियमित वसुलीमध्ये समावेश करुन वसुलीमध्ये वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील.

 

5)  अग्निशमन दल :

अग्निशमन विभागाकडून मूळ अंदाज रु. 100  कोटी 03 लक्ष  अपेक्षित केले होते. शासनाने फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस व फायर प्रिमियम चार्जेस बंद करुन अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी सुरु केली आहे. अग्निशमन विभागास डिसेंबर 2024 अखेर प्रत्यक्ष रु. 56  कोटी  29 लक्ष प्राप्त झाले असून रु.100 कोटी 26 लक्ष सुधारित अंदाज प्रस्तावित केले आहे. सन 2025-26  या आर्थिक वर्षासाठी रु. 127  कोटी  03  लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे.

6)  स्थावर मालमत्ता विभाग :

सन 2024-25  या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता विभागाकडून रु.12 कोटी 50 लक्ष अपेक्षित केले होते ते सुधारित अंदाज रु. 20 कोटी 32 लक्ष अपेक्षित केले आहे. सन 2025-26 मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून रु.15 कोटी  41  लक्ष उत्पन्न अपेक्षित करण्यात आले आहे.

7)  जाहिरात फी :

जाहिरात फी पोटी सन 2024-25  मध्ये रु.24 कोटी 62 लक्ष  उत्पन्न अपेक्षित केले होते.  डिसेंबर 2024 अखेर प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्न  रु.  9 कोटी 53 लक्ष झाले असल्याने सुधारित अंदाजपत्रकात जाहिरात फी पासून रु. 12 कोटी    30 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले असून सन 2025-26 मध्ये रु.22 कोटी    उत्पन्न अंदाजित केले आहे.

8)  अनुदाने :

सन 2024-25  मध्ये  शासनाकडून डिसेंबर 2024  अखेर  रु.914   कोटी 35 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायाभुत सुविधांतर्गत रु.567 कोटी 80 लक्ष , पायाभूत सुविधेंतर्गत एकात्मिक उदयान विकास कार्यक्रमासाठी रु. 70 कोटी 69 लक्ष,  सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी रु.10 कोटी 40 लक्ष , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना मध्ये रु.30 कोटी 78 लक्ष, अल्पसंख्यांक बहुल विकास निधी पोटी रु.11  कोटी, MMRDA कडून मुंबई नागरी पायाभूत सुविधांतर्गत रु. 12 कोटी,  अमृत 2.00 मध्ये रु. 50 कोटी 54 लक्ष इतकी अनुदाने प्राप्त झाल्याने अंदाजपत्रकात रु. 1062 कोटी 71  लक्ष सुधारित उत्पन्न अपेक्षित केले  आहे.

सन 2025-26  या आर्थिक वर्षासाठी  रु. 612 कोटी  59  लक्ष अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे.  यामध्ये प्रामुख्याने पायाभुत सुविधांतर्गत रु.300 कोटी,  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नुतनीकरण व सुधारणा  रु.5 कोटी, एकात्मिक स्मशानभुमी  नुतनीकरण कार्यक्रम रु. 10 कोटी, सार्वजनिक शौचालय बांधकाम व नुतनीकरण रु. 12 कोटी 19 लक्ष , पंधरावा वित्त आयोग रु. 26 कोटी, MMRDA कडून मुंबई नागरी पायाभूत सुविधांतर्गत रु. 1 कोटी, महानगरपालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेंतर्गत रु.25 कोटी , अमृत योजना फेज 2 साठी रु. 48  कोटी  52 लक्ष ,राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील 6 तलावांचे संवर्धनासाठी रु.5 कोटी 62  लक्ष  इत्यादी भांडवली अनुदानांचा समावेश आहे.

9)  म्युनिसिपल बॉन्ड अथवा कर्ज  :

            आजमितीस महापालिकेवर रु. 66  कोटी  कर्ज शिल्लक आहे. केंद्र शासनाने अमृत 2.0 अंतर्गत पाणी पुरवठा विस्तार  व एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभीकरणासाठी रु.555.16  कोटी  रकमेचा डि.पी.आर. मंजूर केला असून या अंतर्गत केंद्र शासनाचा 25%, राज्य शासनाचा 25% व महापालिकेचा 50% हिस्सा असणार आहे. महापालिका  हिस्स्याची रक्कम म्युनिसिपल बॉन्ड उभारुन किंवा कर्जाद्वारे उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन आहे.  सन 2025-26 मध्ये कर्जाद्वारे रु.60 कोटी 89 लक्ष अपेक्षित केले आहे.

            केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानापैकी  मार्च 2024 अखेर अखर्चित निधी दि.1.4.2024 च्या आरंभिच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट आहे. सन 2023-24 व सन 2024-25  मध्ये केंद्र व राज्य शासनाकडील प्राप्त निधीमधून हाती घेतलेली कामे प्रगतीपथावर आहेत.  सन 2024-25 मध्ये शिल्लक राहणारी अंदाजित अखर्चित रक्कम सन 2025-26 च्या आरंभिच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

          अशा प्रकारे सन 2024-25 चे रु. 5025 कोटी 1 लक्ष चे मूळ अंदाज सुधारित करुन आरंभिच्या शिल्लकेसह रु. 6550 कोटी  व सन 2025-26 चे  आरंभिच्या शिल्लकेसह मूळ अंदाज रु. 5645 कोटी जमा बाजूस अपेक्षित केले आहे.

खर्च बाजू

सन 2024-25  मध्ये पूर्ण झालेली  प्रकल्प / कामे / योजना

1. पद्मश्री सिंधुताई सकपाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र

          वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्शन टी.डी.आर. माध्यमातून काम पूर्ण.

2. मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल , नळपाडा

       नळपाडा येथे मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक  100 बेडचे व 7 मॉडयुलर ऑपरेशन थिएटर युक्त आधुनिक पद्धतीचे दोन मजल्यांचे हॉस्पीटल कार्यान्वीत.

 

3.      कौसा हॉस्पीटल कार्यान्वित

4.    स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसुतिगृहाचे नुतनीकरण :

       वागळे येथे  स्वर्गीय मिनाताई ठाकरे प्रसुतीगृहाचे नुतनीकरण करुन लोकार्पण

5.     मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान अंतर्गत आत्तापर्यंत 1,24,144 वृक्षांची लागवड

6.      ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 4845 सोडियम व्हेपर दिव्यांच्या जागी एलईडी दिवे बसविण्यात आले व 10783 एलईडी  फिटिंग बदलून नवीन लावण्यात आले.

7.     ठाणे महापालिका हद्दीत काही मुख्य रस्ते व इतर भागात मिळून 1087 नवीन एलईडी पथदिप बसविण्यात आले.

8.     आदिवासी भागात व डोंगराळ भागामध्ये 400 नवीन सोलार पथदिप लावण्यात आले.

9. रहेजा संकुलासमोरील ध्यानधारणा केंद्र व हँगिंग गार्डन

10.  धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव बाळकुम कार्यान्वीत

11.  स्व. बाबुराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर

12.  कल्पतरु जलकुंभ , दोस्ती बाळकुम जलकुंभ, पिरामल जलकुंभ, बेथनी जलकुंभांची कामे पूर्ण

13. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी , नागलाबंदर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट (नागलाबंदर खाडीकिनारा विकास प्रकल्प)

14.उपवन तलाव येथे म्युझीकल फाऊंटन उभारण्यात आलेले आहे.

15. उपवन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर घाट व बुरुज

              ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून  “माझ्या नजरेतून ठाणे” या उपक्रमांतर्गत नागरिकांचा सहभाग असावा यासाठी नागरिकांकडून ई मेल अथवा लेखी सूचना मागविण्यात आल्या. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून, प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात.

            या सर्व  समोर आलेल्या मुद्दयांचा सांगोपांग विचार करुन त्यातील महापालिका स्तरावरील सूचनांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

      1) स्वच्छ ठाणे

1.1)     600 ते 800 TPD क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प :

            घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणेकामी शासनाकडून ठाणे महानगरपालिकेसाठी मौजे आतकोली ता.भिवंडी येथे 35 हेक्टर जागा मालकी तत्वावर देण्यात आलेली आहे. सदर जागेवर घनकचरा विभागामार्फत  600 ते 800 TPD क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले असून या कामी निविदा प्रक्रिया सुरु आहे. सदर प्रकल्पांतर्गत प्रक्रिया करण्यात आलेल्या कचऱ्यापासून  Refused Derived Fuel (RDF),  Organic Waste व Reject Waste ची निर्मिती होणार आहे. प्रकल्पात निर्माण होणारे RDF चे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्त कंत्राटदाराची राहणार असून सदर RDF  सिमेंट कारखाने अथवा तत्सम वापर असणाऱ्या कंपन्या यांना ठेकेदारामार्फत पुरविण्यात येणार आहे.  तसेच प्रक्रियेअंती निर्माण होणाऱ्या Organic Waste पासून खत / बायोगॅस निर्मिती प्रस्तावित आहे.  आतकोली प्रकल्पासाठी शासनाकडून रु.50 कोटी मंजूर असून महापालिका निधीमधून सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात रु. 5 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

 

 

1.2)  सोलोराईज्ड मेकॅनिकल कम्पोस्टिंगद्वारे ओल्या घनकचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प : 

            ठाणे महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण करुन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणेसाठी ठाणे महानगरपालिका हद्दीतील गायमुख जकात नाका येथे एकुण 100 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर सोलोराईज्ड मेकॅनिकल कम्पोस्टिंगद्वारे प्रक्रिया करुन खत निर्मिती प्रकल्प  शासन निधीमधून उभारण्यात येत आहे. यामध्ये 70 मेट्रिक टन, 25 मेट्रिक टन, व 2 मेट्रिक टन क्षमतेचा प्रत्येकी 1 प्रकल्प व 1.5 मेट्रिक टन क्षमतेच्या  2 मोबाईल कम्पोस्टिंग व्हॅनचा समावेश आहे. 

1.3)   ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प :

            ठाणे शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन कॉम्प्रेस बायोगॅस (CBG) निर्मिती करण्याकरिता प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सदर प्रकल्प ठाणे महानगरपालिकेस घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणेकामी शासनाकडून प्राप्त झालेल्या भुखंडावर स्थापित करण्यात येणार आहे.  सदर प्रकल्पामध्ये दैनंदिन 300 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. 

1.4) शुन्य कचरा मोहिम - संपूर्णत: नवीन कचरा संकलन यंत्रणा   :

            ठाणे महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन चार चाकी घंटागाडया, सहाचाकी घंटागाडया व कॉम्पॅक्टरद्वारे करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कोणतेही वाहन पोहचू शकत नाही अशा ठिकाणचा कचरा संकलीत करणेकरीता कचरा वेचकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर कामाची गुणवत्ता वाढवून शहर कचरामुक्त (शुन्यकचरा) करणेकरीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेत आलेला आहे. शहरामधील भविष्यातील वाढती लोकसंख्या,  पेरिअर्बन भागात होणारे शहराचे विस्तारीकरण तसेच दाटीवाटीच्या वस्त्या येथील कचरा संकलनाची क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच झोपडपट्टी विभाग, व्यावसायिक आस्थापना, मार्केट, रहिवाशी संकुले तसेच मृत जनावरे, रस्ते साफसफाईतून निघणारा कचरा, इत्यादी संकलनासाठी वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपाय योजनांमुळे  शास्त्रोक्त व अत्याधुनिक पद्धतीने शहरातील कचरा संकलनाची गुणवत्ता वाढून GVP  पूर्णपणे बंद होणार आहेत.   

           यासाठी सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात घंटागाडी योजना / कॉम्पॅक्टर  या लेखाशिर्षकांतर्गत रु. 90  कोटी व  कचरा वेचक मानधन व सोयी सुविधा या लेखाशिर्षकांतर्गत रु. 4 कोटी 50 लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

1.5) सार्वजनिक रस्ते साफसफाई :

          ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण रस्त्यांपैकी 270 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची सफाई कंत्राटी पद्धतीने करण्यात येते तर उर्वरित रस्त्यांची सफाई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कायम कामगारांमार्फत करण्यात येते. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच वाणिज्य क्षेत्रात दिवसातून दोन वेळा सफाई करण्यात येते. सदरचे काम अधिक प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने 25 गट तयार करण्यात आलेले असून त्यांचेकडून  रस्ते साफसफाईचे काम करण्यात येते.  शहरातील प्रमुख हायवे स्वच्छतेसाठी स्वतंत्र दोन गट तयार करण्यात आलेले आहेत. त्यांच्याद्वारे आनंदनगर जकात नाका ते माजिवडा गोल्डन डाईज सर्कल पर्यंत रस्त्याची साफसफाई करण्यात येते.

         यासाठी सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात खाजगीकरणातून रस्ते साफसफाईसाठी  रु.85 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

 

1.6)       सर्वंकष स्वच्छता मोहिम (Deep Clean Drive) :

  महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक शनिवारी सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.

  रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक, सार्वजनिक प्रसाधनगृहे, शाळा, कार्यालये, रुग्णालये व इतर वास्तू यांची स्वच्छता करण्यात येत आहे.

  स्वच्छता मोहिमेमध्ये स्थानिक नागरिकांचा चांगला सहभाग मिळत असून नागरिकांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

      यासाठी प्रभाग समितीकडील  अत्यावश्यक खर्चासाठी  रु.30 लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

1.7)      पाळीव प्राण्यांची विष्ठा न उचलल्यास दंडात्मक कारवाई :

 

        ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे “ महापालिका स्वच्छता आणि आरोग्य " उपविधीची अंमलबजावणी करण्यात येणार असून पाळीव प्राण्यांकडून पदपथ, उद्याने, रस्ते इ. सार्वजनिक ठिकाणी विष्ठा करुन परिसरात घाण केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करुन प्रतिबंध करण्यात येणार आहे.

1.8)       नागरिकांचा अभिप्राय नोंदविणे :

          ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाच्या साफसफाई, देखभाल दुरुस्ती व सर्व समावेश निगा-देखभाल, पाणी पुरवठा व अटेन्डटची उपलब्धता इ.बाबत परिसरातील नागरिकांकडून अभिप्राय नोंदविणेसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म विकसीत करण्यात येणार असून त्यामार्फत त्यांचे इनपुटस, रिपोर्टस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तात्काळ उपलब्ध होतील.

2)    स्वच्छ शौचालय

2.1) अत्याधुनिक Light Gauge Mini Container शौचालय उभारणी :

            ठाणे शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी मुख्यत्वे करुन महिला वर्गाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शहरातील बाजारपेठा, महामार्ग या ठिकाणी कमीत-कमी जागेत अत्याधुनिक पद्धतीचे सर्व सोयी सुविधायुक्त Light Gauge Mini Container  शौचालये उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, त्यासाठी ठाणे शहरामधील वर्दळीच्या ठिकाणाच्या प्रमुख 13 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. निविदा प्रक्रिया राबवून सदर ठिकाणी 10X20 मोजमापाचे  Light Gauge Mini Container  शौचालये उभारण्यात येणार आहेत. शौचालयांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जागेपैकी 50% जागेवर महिलांकरिता वेंडींग मशिन, वॉश बेसीनसह 24 तास पाण्याची सुविधा असलेले स्वंतत्र शौचालय उभारण्यात येणार असून उर्वरित 50% जागा निविदेद्वारे नियुक्त कंत्राटदारास व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

2.2)   शौचालय नुतनीकरण व पुनर्बांधणी :

ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात नुतनीकरणांतर्गत एकूण 715 युनिटच्या 9054  सिट्सचे नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून मार्च 2025 पर्यंत 699 युनिट्समधील 8759  सिट्सचे नुतनीकरण पुर्ण होणे अपेक्षित आहे.

ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात पुनर्बांधणी अंतर्गत एकूण 86 युनिट्सच्या 1151 सिट्सच्या  पुनर्बांधणीची कामे हाती घेण्यात आली असून मार्च 2025 अखेर 41 युनिट्सच्या 545 सिट्सच्या पुनर्बांधणीची कामे पुर्ण होणे अपेक्षित आहे.  

           यासाठी सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात सार्वजनिक शौचालय बांधणेसाठी रु.  5  कोटी व दुरुस्ती / अद्ययावतीकरणासाठी रु.5 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.  तसेच सार्वजनिक शौचालय बांधणेसाठी पायाभुत सुविधेंतर्गत एकूण रु.60 कोटी अनुदान मंजूर असून त्यातील कामे प्रगतीपथावर आहेत.

2.3) सार्वजनिक शौचालयांची सर्वंकष स्वच्छता :

          ठाणे शहरातील सामुदायिक / सार्वजनिक शौचालय 24 तास स्वच्छ राहणे करीता आवश्यक स्थापत्य व विद्युत कामे करून घेण्यात येत आहेत. प्रत्येक शौचालयाच्यावर ओव्हरहेड टँक बसवून 24 तास पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शौचालयाची यांत्रिक पद्धतीने 24 तास सफाई व निगा देखभाल करणेकरीता सर्वसमावेशक (Comprehensive) निविदा अंतिम करण्यात आलेली असून  प्रभाग समिती निहाय कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयामध्ये 24 तास मदतनीस, हेल्पर उपस्थित राहील याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.  यासाठी सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात रु. 12 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

3)    खड्डेमुक्त ठाणे

       मजबूत रस्त्यांचे जाळे :

ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये महापालिकेच्या मालकीचे 384 कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 258 कि.मी. लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण व यु.टी.डब्ल्यू.टी., 23  कि.मी. रस्ते मास्टिक तसेच उर्वरित 103  कि.मी डांबरी रस्ते आहेत.

सन 2023-24 व 2024-25 या कालावधीत मा. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शासनाकडून पहिल्या टप्प्यात रु.214 कोटी व दुस-या टप्प्यात रु.391 कोटी  असे एकूण रु.605 कोटी अनुदान प्राप्त झालेले आहे. या अनुदानातून शहरातील 283 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. एकूण रस्त्यांची लांबी 135 कि.मी असून यामध्ये 10.46 कि.मी. काँक्रीट रस्ते, 55 कि.मी. युटीडब्ल्यूटी व 50.44 कि.मी. डांबरी रस्ते व 19 कि.मी. चे मास्टीक प्रक्रियेनुसार रस्ते तयार करण्यात आले असून, यामध्ये महापालिका परिक्षेत्रातील प्रभाग समितीमधील रस्त्यांचा समावेश आहे.  या अनुदानातून शहरातील  283 रस्त्यांपैकी 275 रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

महापालिकेच्या निधीमधून महापालिकेच्या अखत्यारीतील असलेले इतर सर्व प्रकारचे रस्ते सुस्थितीत राखण्याकरीता  डांबरीकरण पद्धतीने रिसरफेसिंग, सिमेंट काँक्रीटीकरण व यु.टी.डब्ल्यू.टी. पद्धतीने काँक्रीटीकरणाची कामे सुरु  आहेत.

 सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात रस्ते दुरुस्तीसाठी रु. 5 कोटी तरतूद प्रस्तावित आहेत. विविध संस्थांमार्फत सेवा वाहिन्यांसाठी खोदण्यात येणा-या रस्त्यांच्या पुनर्पुष्टीकरणासाठी रु. 20 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.

4)   सुंदर ठाणे

स्वच्छ  व सुंदर तलावांचे शहर  :

एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभीकरण

          ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 37 तलाव आहेत. तलावांचे शहर म्हणून ठाणे शहराचा नावलौकीक आहे. अमृत 2.00 योजनेतील Water Bodies Rejuvenation अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आंबेघोसाळे तलाव, ब्रम्हाळा, रायलादेवी, खारेगाव , कचराळी , खिडकाळी , जोगीला , देसाई, दातीवली , कोलशेत , कौसा , कळवा शिवाजी नगर , कमल  तलाव, हरियाली तलाव, तुर्फेपाडा तलाव या 15 तलावांची एकूण रु. 59 कोटी 94 लक्ष रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत.

यामध्ये तलावास - संरक्षण (गॅबियन) भिंत, कुंपण भिंत, बैठक व्यवस्था, जॉगिंग ट्रॅक, पदपथ, रेलिंग, एरीएशन फाऊंटन (कारंजे), विद्युतीकरण, सुरक्षा व्यवस्थेकरीता सी. सी. टी. व्हि. व साऊंड सिस्टिम, जलशुद्धीकरण व्यवस्था, उद्यान विषयक काम करणे, झाडे लावणे, रंगरंगोटी करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. सदर प्रकल्पाची भौतीक प्रगती 75% असून सदर प्रकल्प माहे मे 2025  पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

    5) महिला , ज्येष्ठ व दिव्यांग विषयक उपक्रम  : 

5.1)  महिला सुरक्षितता :

  ठाणे महानगरपालिका शाळेतील मुलींसाठी  स्वसंरक्षणाकरीता  कराटे प्रशिक्षण देणे.

  किशोरवयीन मुलींना लैगिंक शिक्षण, मासिक पाळी व आरोग्य विषयक जनजागृती करणे.

  कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याबाबत जनजागृती करणे.

  महिलांसाठी / मुलींसाठी समुपदेशन केंद्र चालविणे,  हेल्पलाईन चालविणे व विधी सल्ला केंद्र चालविणे.

         यासाठी सन 2025 -26 च्या अर्थसंकल्पात " महिला सुरक्षितता उपाय योजना  "  या लेखाशीर्षांतर्गत रु. 20  लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

5.2) महिला शौचालय :

            महिलांसाठी समर्पित (Dedicated) सार्वजनिक शौचालयांचे जाळे अधिक सक्षम करणे नियोजित असून विशेषत: मार्केट एरिया, उदयानात  महिलांसाठी नव्याने शौचालय निर्माण करण्याचे नियोजन आहे.

यासोबतच ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाकडील वापरासाठीचे आयुर्मान संपलेल्या बसेसमध्ये अंतर्गत बदल करुन महिलांसाठी स्वच्छतागृह तयार करुन ते बचत गटांमार्फत चालविण्यासाठी देण्याचे नियोजन आहे. यासाठी अर्थसंकल्पात रु. 50 लक्ष  तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

5.3)     महिला व बालकल्याण कार्यक्रमांतर्गत कल्याणकारी योजना :

•         कचरावेचक महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणे. (18  वर्षापर्यत)

•         विधवा/घटस्फोटीत महिलांच्या मुलींच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य करणे.

•         मुली/ महिला खेळाडूकरिता गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना  शिष्यवृत्ती देणे.

•         कोणत्याही कारणामुळे पतीचे / कर्त्या पुरूषाचे निधन होऊन एकल/विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत योजना राबविणे.

•         दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिलांना (एचआयव्हीग्रस्त/ कॅन्सरग्रस्त/ अर्धांगवायू, इ. ) उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य करणे.

•         मुलगी जन्माला आल्यावर तिच्या सर्वांगिण विकासासाठी आर्थिक सहाय्य करणे.

•         पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या अथवा पहिली मुलगी असतांना दुस-या मुलीनंतर शस्त्रक्रिया करणा-या महिलांना  अर्थसहाय्य करणे.

•         ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पद्धतीवरील सफाई कामगारांच्या इयत्ता 1 ली ते पदवी पर्यतच्या शिक्षण घेणा-या मुलांना अर्थसहाय्य करणे.

 

             उपरोक्त प्रमाणे विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा महापालिकेचा मानस असून त्यासाठी सन 2025-26  या आर्थिक वर्षासाठी एकूण रक्कम रु. 19  कोटी 75 लक्ष  तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली  आहे.

 

   5.4)  ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा :

  ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र / ज्येष्ठ नागरिक भवन तयार करुन त्यामध्ये त्यांची काळजी घेण्यासाठी केअर टेकर, वाचनासाठी पुस्तके तसेच आरोग्यासाठी क्लासेस , योग प्रशिक्षण वर्ग इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रयोजन आहे. सन 2025- 26 च्या अर्थसंकल्पात "ज्येष्ठ नागरिक केंद्र " या लेखाशीर्षांतर्गत रु. 2 कोटी तरतूद करण्यात आली आहे.

  60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा सन 2024-25 पासून  उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

5.5)  दिव्यांग कल्याणकारी योजना :

         सर्व स्तरावरील दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास करणे व त्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशातून सन 2025-26 या आर्थिक वर्षात पुढील काही योजना प्रस्तावित करण्यात येत आहेत.  

समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजना

  दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती / अर्थसहाय्य देणे.

  जिल्हास्तर/राज्यस्तर/ राष्ट्रीयस्तर / आतंरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त  दिव्यांग खेळाडू यांना शिष्यवृत्ती / अर्थसहाय्य देणे.

  दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरीता लाभार्थ्यांना थेट अर्थसहाय्य करणे.

  दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्याकरिता लाभार्थ्याना थेट अर्थसहाय्य करणे.

  दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे.

  दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरीता निधी उपलब्ध करुन देणे.

  दिव्यांग बेरोजगारांना अर्थसहाय्य देणे.

  दिव्यांग व्यक्तीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे.

  60 वर्षे व त्यावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे.

  दिव्यांग व्यक्तींच्या बचत गटांना अर्थसहाय्य देणे.

  कुष्ठरुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे.

  दिव्यांग व्यक्ती करिता स्टॉल उभारणी करणे.

  ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींना आरोग्य उपचार व पुनर्वसन सेवा, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे

  दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करणे.

  दिव्यांग व्यक्तींना निरामय आरोग्य विमा योजनेकरिता अर्थसहाय्य करणे. (गतिमंद, स्वमग्न, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती यांचेकरिता)

 

              यासर्व बाबींसाठी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात दिव्यांग कल्याणकारी योजना या लेखाशीर्षांतर्गत रु. 17  कोटी तरतूद प्रस्तावित आहे.

5.6)  दिव्यांग कल्याण केंद्र :

शासन निधीतून दिव्यांग कल्याण केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे.

  सीएसआर माध्यमातून दिव्यांग कल्याण केंद्राचे नियोजन होणार आहे.

   यामध्ये लवकर निदान व उपचार, वाचा व भाषा उपचार, श्रवणदोष परिक्षण, विशेष शिक्षण व कौशल्य विकास, कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने, नृत्य, संगीत, कला व हस्तकला प्रशिक्षण देणे

  दिव्यांग महोत्सवाचे आयोजन

  दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता स्वतंत्र व्यासपीठ

  लाईटहाऊस अंतर्गत दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे

  दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

 

 

 तृतीय पंथीयांसाठी योजना :

  तृतीय पंथीय व्यक्तींचा सर्व्हे व नोंदणी करणे तसेच त्यांना उपजिविकेसाठी अर्थसहाय्य देणे

  तृतीय पंथीयांना वाममार्गापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरु करणे. 

                  यासर्व बाबींसाठी  सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात तृतीय पंथीयांसाठी योजना या लेखाशीर्षांतर्गत रु.  15  लक्ष  तरतूद प्रस्तावित आहे.

6) आरोग्य सुविधा :

6.1) मोतिबिंदु शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविणे :

           ठाणे शहरातील लोकसंख्या 25.23 लक्ष  इतकी असून त्यापैकी 20 ते 30 टक्के लोकसंख्या ही दारिद्रय रेषेखालील व नॉनक्रिमीलेयर उत्पन्न गटातील आहे. या गटातील नागरीकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात जावून करणे शक्य होत नाही. सदर रुग्णांचा महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे मोठया प्रमाणावर भर आहे. अशा रुग्णांची शस्त्रक्रिया करणेकरीता ठाणे महानगरपालिकेमार्फत योजना राबविणे आवश्यक आहे.  सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रुग्णांना मोतिंबिदु शस्त्रक्रिया ही सेवा खाजगी रुग्णालयात विनाशुल्क देण्यात येणार आहे.  याकरीता खाजगी रुग्णालयासोबत ठाणे महानगरपालिका  सामंजस्य करारनामा  करणार असून, यामुळे रुग्णांना चांगल्या प्रतीची सेवा देण्यात येईल.

6.2)  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम :

1)     टी.बी. या आजाराचा प्रसार आटोक्यात आणण्याच्या दृष्टीकोनातुन ठाणे महानगरपालिकेंतर्गत उपचार घेणाऱ्या जवळपास 10000 टी.बी. रुग्णांना मास्क, सॅनिटायझर व स्पिटुन असा एक संच देण्यात येणार आहे. त्याचा वापर टी.बी. रुग्णांनी केल्यामुळे समाजामध्ये इतरांना टी.बी.ची लागण होण्यापासुन बचाव करता येईल.

2)     टी.बी.ची लागण झालेल्या रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती  कमी झालेली असते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवून आजारातून लवकरात लवकर बरे होण्याकरिता आहारात अतिरिक्त प्रोटीनची गरज असते. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेंतर्गत उपचार घेत असलेल्या जवळपास 10000 टी.बी. रुग्णांना प्रोटीन पावडरचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

6.3) राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम:

           राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत, Development and operations of Health & Wellness Centres कार्यक्रमामध्ये एन.सी.डी. (Non Communicable Disease) चा समावेश होतो. एन.सी.डी. अंतर्गत कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग व पक्षाघात या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाचा (NPCDCS) समावेश करण्यात आलेला आहे. एन.सी.डी. अंतर्गत कर्करोग तपासणी करण्यात येते. कर्करोगामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जगभरातील महिलांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. सद्यस्थितीत भारतात दरवर्षी 75000 पेक्षा जास्त महिलांचा  गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यु होतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी पॅपस्मीअर तपासणी करण्यात येते. तज्ञ लोकांच्या मते 30 ते 65 वयोगटातील महिलांनी  दर तीन ते पाच वर्षांनी पॅपस्मीअर चाचणी करणे अभिप्रेत आहे.  

             ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 33 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 6 प्रसुतिगृहे व 1 रूग्णालय कार्यरत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगास आळा घालण्याकरिता किंवा लवकर निदान होणेकरीता ठाणे महानगरपालिकेच्या 6 प्रसुतिगृहांमध्ये COLPOSCOPY सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच तेथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, प्रसाविका व परिचारिका यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

6.4)  मुख्यमंत्री मातृत्व भेट योजना :

      या योजनेंतर्गत नवजात शिशुला आणि त्याच्या मातेला उपयोगी ठरतील अशा एकूण 11 वस्तूंचा दर्जेदार संच ठाणे महानगरपालिका प्रसुतिगृहात बाळंतपण झालेल्या मातेस रुग्णालय सोडून घरी जातांना दिला जातो. सदर मातृत्व भेट वस्तू उपयोगिता बाबत संबंधित लाभार्थ्यांमध्ये समाधान आहे. डिसेंबर 2024 अखेर या योजनेंतर्गत 8500 संचाचे वाटप झालेले आहे. सन 2025-26 मध्येही सदरची योजना सुरु राहणार आहे.

6.5) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे नुतनीकरण व सुधारणा :

            छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ठाणे जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील रुग्ण देखील उपचारासाठी दाखल होत असतात. या रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी यापुर्वी शासन निधीतून रु. 60 कोटी निधी प्राप्त झाला असून अतिरिक्ता रु.75 कोटी निधी मंजूर झाला आहे.  

 

6.6) राजीव गांधी  वैद्यकीय महाविद्यालय व वसतीगृहाचे स्थलांतरण :

            ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बाळकुम भागातील लोढा संकुलामधील टाऊन सेंटर आरक्षणांतर्गत तळ +  5 आणि तळ + 12 इमारतींमध्ये राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व वसतीगृह स्थलांतरीत करणेसाठी शासनाकडून रु.138 कोटी शासन निधी मंजूर झाला आहे. सदरचे महाविद्यालय व वसतीगृह स्थलांतरीत झाल्यावर उपलब्ध होणारी जागा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारासाठी  वापरात येणार असून सद्याची असणारी 500 बेड ची संख्या  890 एवढी होणार असून  390 वाढीव बेड उपलब्ध होणार आहेत.

6.7) प्रसुतीगृहांचे नुतनीकरण व सुधारणा :

        ठाणे महानगरपालिका हद्दीत वर्तकनगर, बाळकुम, घोलाईनगर, रोझा गार्डनिया व मुंब्रा येथील प्रसुतीगृहांचे नुतनीकरण व सुधारणा शासनाकडून प्राप्त  रु.11 कोटी  निधीतून करण्यात येत आहेत.

6.8)      दिवा रुग्णालयाकरीता जागा भुसंपादन :

          ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा रुग्णालयाकरीता जागा भूसंपादन करणेसाठी रु. 58 कोटी शासन निधी प्राप्त झाला आहे. भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांजेकडे पाठविण्यात आला असून जागा भूसंपादनानंतर रुग्णालय बांधकामाचे नियोजन आहे.

7)  शैक्षणिक गुणवत्ता :

1) मराठी माध्यमाच्या शाळांचे सक्षमीकरण :

मराठी माध्यमाच्या शाळांचे सक्षमीकरणांतर्गत शासनाकडून रु. 3 कोटी अनुदान मंजूर झाले असून त्यामधून ठाणे महानगरपालिकेच्या 60 शाळांमध्ये सोलार ऑपरेटेड रोबोटिक कोडिंग आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रयोगशाळा बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

2) विज्ञान मंच :

ठाणे महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांतील इ. 8 वी व इ. 9 वी च्या वर्गातील 34 विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन केंद्र (इस्त्रो) येथे वैज्ञानिक सहल घडवून आणण्यात आलेली आहे. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी इस्त्रोचे म्युझियम, इस्त्रोच्या रॉकेट लॉचिंग या ठिकाणांची माहिती घेतली. या उपक्रमातील विद्यार्थ्यांचे अनुभव हस्तपुस्तिकेत लिखित करण्याचे काम सुरु आहे. सन 2025-26  मध्ये देखील अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.

 विज्ञान मंच या उपक्रमांतर्गत नेहरु सायन्स सेंटर व नेहरु तारांगण येथे 500  विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट, खोडद येथे 40 विद्यार्थ्यांना जगातील सर्वात मोठी दुर्बिण असलेल्या ठिकाणची  सहल आयोजित करण्यात आली. सन 2025-26 मध्ये देखील अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.

3) आर्दश शाळा (मॉडेल स्कूल) :

ठाणे महानगरपालिकेच्या प्राथमिक 103 व माध्यमिक 23 अशा एकूण 126 शाळा असून त्यापैकी 62 शाळा हया आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) करण्याकरीता शासनाकडून रु.50 कोटी निधी प्राप्त झाला  असून सदरचे काम प्रगतीपथावर आहे.

4)  बालरंगकर्मी योजना (अभिनय प्रशिक्षण) टप्पा क्र. ३ :

      ठाणे शहर हे सांस्कृतिक व कलेचा वारसा लाभलेले शहर आहे. हा सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या शाळांतील इ. 5 वी ते इ. 9 वी  च्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी बालरंगकर्मी योजनेमध्ये  (अभिनय प्रशिक्षण)   400  विद्यार्थ्यांची निवड करुन 6 महिन्यांच्या कालावधीत प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे सन 2025-26  मध्ये देखील अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.

5)  सी एस आर माध्यमातून शालेय उपक्रम :

  सी.एस.आर. च्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांतील 70 वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. तसेच  सर्व 106 प्राथमिक शाळांमध्ये इ. 1 ली ते इ. 5 वी चा गणित व इंग्रजी विषयाचा डिजिटल अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे.

   प्राथमिक 10 व माध्यमिक 5 शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा तयार करण्यात आलेल्या आहेत.

  6 प्राथमिक शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी उपक्रम सुरु आहे.

  विज्ञान प्रदर्शन व उपक्रम 20 प्राथमिक शाळांमध्ये सुरु आहे.

  स्टेम लॅब एका प्राथमिक शाळेत तयार करण्यात आली आहे.

  10 शाळांमध्ये चित्रकला विषय व त्यावरील शासनाच्या परीक्षेस विद्यार्थ्यांना बसविणे हा उपक्रम सुरु आहे.

  ठा.म.पा. च्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप.

  5 ते 14 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी व  Anemia असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत औषधे.

  इ. 3 री ते इ. 7 वी मधील विद्यार्थी व पालक यांना रस्ता सुरक्षा जागृती कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन व पालकांना मोफत हेल्मेट वाटप.

  ठा.म.पा. च्या 9 प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत न्यूट्रीशनल लाडू

  ठा.म.पा.च्या 2 प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, फुटबॉल व कबड्डी खेळांचे मोफत प्रशिक्षण.

  ठा.म.पा. शाळांतील मुलांना ऑनलाईन पद्धतीने मोफत शास्त्रीय नृत्य व व्होकल संगीत प्रशिक्षण.

 

सन 2025-26  मध्ये प्रस्तावित  उपक्रम

  मुलींना कराटे प्रशिक्षण :

ठाणे महानगरपालिकेच्या शाळांतील इ. 5 वी ते इ.10  वी च्या मुलींना स्वरक्षणाकरीता कराटे प्रशिक्षण प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

  कल चाचणी

      ठाणे महानगरपालिकेच्या इ. 9 वी व 10  वी मधील विद्यार्थ्यांना   इ. 10  वी नंतर कोणत्या क्षेत्रात आपले करिअर करण्यासाठी इच्छुक आहेत याकरीता कल चाचणी घेऊन करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा  कल जाणून घेऊन त्यानुसार विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

   प्रथमोपचार कक्ष :

       शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक 29  ऑक्टोंबर, 2024 रोजीच्या शासन निर्णयातील सुचनांनुसार ठाणे महानगरपालिकेच्या  शाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता व जलद प्रथमोपचाराच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत एक प्रथमोपचार कक्ष तयार करण्यात येणार आहे.

  बझर (अलार्म) :

     शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेकरीता शौचालयात बझर (अलार्म) बसविण्यात येणार आहेत.

  पारंपारीक खेळ :

ठाणे महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना जिल्हा अथवा राज्यस्तरीय खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरीता शाळांमध्ये पारंपारीक खेळाचे व्यवसायिक प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  दिल्लीतील शासकीय शाळा भेट :

ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचा भौतिक व गुणवत्ता दर्जा वाढविणेकरीता ठाणे महानगरपालिकेच्या निवडक शिक्षकांची निवड करुन दिल्लीतील शासकीय शाळांना भेटी देऊन माहिती घेणेकरोता शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

  महापालिका शाळांचा कायापालट :

महापालिकेच्या 25 शाळा सिंघानिया शैक्षणिक संस्थेच्या सहयोगातून उन्नत करणे

* शैक्षणिक गुणवत्ता वाढविणार

* विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, गणन, कौशल्य विकसित करण्यावर भर देणे

* अध्यापन तंत्राच्या अनुषंगाने शिक्षकांना प्रशिक्षित करणे

शाळाकरिता अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरविणे

ई क्लासरुम, ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून प्रभावी शिक्षण, मुलभूत सुविधा (रंगरंगोटी, प्रसाधनगृहे) ई लायब्ररी, शैक्षणिक साधने निर्माण करुन देण्यात येणार आहे.

डी-मार्ट संस्थेच्या सहयोगाने 5 शाळांचा विकास

* महापालिका शाळांचा शैक्षणिकदृष्ट्या कायापालट करणेसाठी सदर संस्थेसोबत करार करुन उच्च प्रशिक्षित शिक्षक पुरविणे

* डिजीटल क्लासरुम, अद्ययावत वाचनालय, बौद्धि क वृद्धीसाठी आधुनिक उपकरणांचा समावेश करणे.

शाळांमध्ये 'रोटरी नॉलेज एन्हान्समेंट आणि फॅकल्टी सेंटर'

* ठामपा शाळेतील व इतर गरजू विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

Robotics, Drone बनविणे व दुरुस्ती, रेफ्रिजरेटर, विद्युत यंत्रे व इतर दुरुस्ती प्रशिक्षण

* सॉफ्ट स्किल्स विकसित करणे (इंग्रजी भाषेतून संवाद व संभाषण करण्याचे प्रशिक्षण)

* प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा विकसित करणे.

  प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विदयार्थ्यांच्या विविध योजनांसाठी रु.26 कोटी 75 लक्ष, महापालिका शाळा मजबुतीकरणासाठी रु. 5 कोटी  व शाळा बांधकामासाठी रु. 2 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

13)         शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, शाळांमध्ये महापालिका निधी रु.1 कोटीमधून  व सीएसआर निधीमधून सी.सी.कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

 8 ) हरित ठाणे उपक्रम :

8.1) रुपादेवी मंदिर मैदान भूखंडावर उदयान विकसित करणे

    ठाणे महानगरपालिकेच्या वागळे इस्टेट विभागातील रुपादेवी मंदिर येथील एम.आय.डी.सी.चा  प्लॉट ठाणे महानगरपालिकेस हस्तांतरीत  करण्यात आलेला असून, या ठिकाणी मैदान विकसित करणेचे काम हाती घेण्यात आलेले आहे. सदर कामासाठी शासनाकडून रु.30  कोटी इतका निधी मंजूर झाला आहे.

         सदर निधीतून मुलांना खेळण्यासाठी फुटबाल टर्फ बनविणे, विद्यार्थ्यांना / कलाकारांना त्यांचे कलागुण सादर करता यावे या करीता उद्यानात अॅम्फी थिएटर उभारणे, बालकांना खेळण्यासाठी प्ले ग्राऊंड व विविध प्रकारच्या खेळण्याच्या स्लाईड बनविणे, ज्येष्ठांकरीता विरगुंळा व योग साधना केंद्र, आकर्षक कारंजे, जॉगींग ट्रॅक, रंगीबेरंगी फुलझाडे लावणे, विदयुत रोषणाई करणे, सर्व सुविधांयुक्त शौचालय (पोर्टा केबीन) बसविणे, सुरक्षितेच्या दृष्टीने संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक कक्ष बांधणे या  कामांचा समावेश आहे.

 

8.2) एकात्मिक उद्यान विकास प्रकल्प :

          ठाणे महानगरपालिकेने शहरातील नागरीकांना मनोरंजनात्मक सुविधा उपलब्ध करणे, शहराची संस्मरणीय ओळख निर्माण करणे, नागरीकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणणे तसेच लोकांना निसर्गाशी पुन्हा जोडण्यास मदत करण्यासाठी एकात्मिक उद्यान विकास प्रकल्प हाती घेतला आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 147 उद्याने असून त्यापैकी सदर एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत एकूण 84 उद्यानांचे नुतनीकरणाचे काम ठाणे महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. सदर 84 उद्यानांपैकी 28 उद्यानांचे पुर्णत: नुतनीकरण करण्यात येणार असून उर्वरीत 56 उद्यानांची आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार आहे. सदर कामांकरीता एकूण रु. 75 कोटी निधी शासनाकडून प्राप्त आहे. सदर उद्यानांच्या  सुशोभीकरणांतर्गत पदपथ नुतनीकरण, ओपन जिम साहित्य बसविणे, आसन व्यवस्था, कॅफेटेरिया, प्रसाधनगृह, स्कल्पचर्स, गेट, गझिबो, सुरक्षा रक्षक केबिन आणि कंपाउंड वॉल, विद्युतीकरणाचे काम - लाईटींग, सी. सी. टी. व्हि., कारंजे तसेच लॅन्डस्केपिंग संबंधित कामांचा समावेश आहे.

सदर प्रकल्पातील कामे प्रगतीपथावर असून  माहे ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

8.3)  वृक्षवल्ली-2025

       ठाणे महानगरपालिका, उद्यान विभाग व वृक्षप्राधिकरणाच्या विद्यमाने आयोजित झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे 14 वे भव्य प्रदर्शन “वृक्षवल्ली-2025” हे “जैवविविधतेचे सप्तरंग” या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला यावर्षी सुमारे 2 लक्ष नागरिकांनी भेट दिली आहे.

8.4)     रस्ता दुभाजक व हरित जनपथ :

•         ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 114 रस्ता दुभाजक व हरित जनपथ असून त्यांचे क्षेत्रफळ अंदाजे 1,50,516 चौ.मी. इतके आहे व त्याची

      लांबी अंदाजे 82 कि.मी. इतकी आहे.

•         सदर 114 रस्ता दुभाजक व हरित जनपथ या  पैकी " जाहिरात हक्क"  बदल्यात,कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी व प्रायोजक तत्त्वावर 26 रस्ता दुभाजक व हरित जनपथ यांची निगा व देखभाल करण्यात येत आहे. यांचे अंदाजे 45,325 चौ. मी. इतके क्षेत्रफळ असून याची लांबी अंदाजे 22 कि.मी.  इतकी आहे.

9) पोषक व शाश्वत पर्यावरणावर भर :

9.1)  वातावरणीय स्थितीस्थापकत्व प्रकल्प :

      वातावरणीय बदलामुळे ओढावलेल्या परिणामांना यशस्वीरित्या तोंड देणे, त्यासाठी सुसज्ज राहणे, त्यांचे व्यवस्थापन करणे आणि त्याचवेळी त्या वाईट परिणामांची तीव्रता रोखणे यासाठी  सी.ई.ई.डब्ल्यू. या संस्थेने ठाणे महानगरपालिकेसाठी हीट ॲक्शन प्लॅन , फ्लड ॲक्शन प्लॅन, सांडपाणी पुनर्वापर, हवा गुणवत्ता निर्णय प्रणाली तयार केलेली आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात खालील प्रकल्प हाती घेण्याचे योजिले आहे.

  जास्त रहदारीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे

  शासकीय इमारतीमध्ये कूल रूफिंग संकल्पना राबविणे

  बस स्टॉप, सार्वजनिक फुटपाथ इत्यादी ठिकाणी हिरव्या भिंती तयार करणे

  अति उष्णता असलेल्या प्रभागामध्ये कूलिंग शेल्टर उभारणे

  ठाणे महापालिका  क्षेत्रात हवा गुणवत्ता मोजणा-या यंत्रणांची संख्या वाढविणे

  मुख्य चौकांमध्ये mist फाऊंटन उभारणी करणे

  नागरिकांना त्वरित आपत्कालीन परिस्थितीची माहिती पोहोचविण्यासाठी सुविधा तयार करणे

 

       यासाठी सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात वातावरणीय स्थिती स्थापकत्व प्रकल्प या लेखाशीर्षांतर्गत रु.1 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.

9.2)      स्वच्छ हवा कृती आराखडा :

          या  अंतर्गत पंधरावा वित्त आयोगामार्फत प्राप्त अनुदानातून 160 ई-बस खरेदी करण्यात येणार आहेत.

             ठाणे शहरातील रस्त्यांच्या  दैनंदिन साफसफाईसाठी 100 नग  Manual Sweeper खरेदी करण्यात येणार आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई नियमीत होण्यासाठी सदर मशीन उपयुक्त ठरणार आहे.  

             शहरात रस्त्यांवर पार्किंग केलेल्या गाड्यांच्या खाली धुळ तशीच राहते. त्यासाठी दोन  Vaccum based sweeping machine घेण्यात येणार आहेत.

             शहरातील रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते पाण्याने धुण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश दिले आहेत. त्या अन्वये   2 Multipurpose Sprayer and Suppression Vehicle खरेदी करण्यात येणार आहेत. सदर मशीनद्वारे रस्ते तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांवरील धुळही साफ करण्यात येणार आहे.

9.3)      माझी वसुंधरा :

           माझी वसुंधरा स्पर्धेअंतर्गत प्राप्त बक्षिस रक्कमेतून पुढील कामे करण्यात येणार आहेत.

  ठाणे महानगरपालिका क्षेत्रात Solar / LED Street Lights

  इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात 30 ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटस तयार करणे.

  शासकीय इमारतींमध्ये  Rain Water Harvesting करणे.

  दिवा डंम्पिग ग्राऊड येथील धुर/धुळ प्रदुषण रोखण्यासाठी एक Mist Spray मशीन खरेदी करणे, तसेच चौकातील धुळ प्रदुषण रोखण्यासाठी एक  Mist Spray मशीन खरेदी करणे

  ठामपा इमारतीमध्ये Solar Rooftop बसविणे.

9.4)   कांदळवन संरक्षण व संवर्धन :

        ठाणे शहराचा 3.29 स्वे.कि.मी. भाग कांदळवन क्षेत्रात येतो. त्यामध्ये ठाणे खाडीचा समावेश आहे. ठाणे खाडीच्या दोन्ही बाजूंना कांदळवन असून, हे भारतातील एकूण कांदळवन प्रजातींपैकी सुमारे 20 % प्रजातींना सामावून घेते.

 

         ठाणे महानगरपालिकेने कांदळवन क्षेत्रात भराव होऊ नये यासाठी पुढील उपाययोजना केल्या आहेत.

•      कांदळवनावर टाकण्यात येणारे डेब्रिजचे नियंत्रण करण्यासाठी नौपाडा आणि माजीवाडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये दक्षता पथके स्थापन केलेली आहेत.  तसेच, कांदळवन क्षेत्रांच्या ठिकाणी महापालिकेद्वारे उभारण्यात आलेल्या CCTV कॅमेराद्वारे नियमितपणे पाहणी करण्यात येत असून Video Analytics Report नुसार  सदर ठिकाणी भरणी झाल्याचे आढळून आले नाही.

•      प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत 04 ठिकाणी Height Restriction Barrier उभारण्यात येणार आहेत.

•      कांदळवन क्षेत्रात वाहनांची रहदारी रोखण्यासाठी  कुंपण लावण्यात आलेली आहेत तसेच कांदळवन संरक्षणासाठी " राखीव वन " असे बॅनर लावण्यात आले आहेत.

•      कांदळवनांच्या ठिकाणी खाडी प्रवाह सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका ट्रेन्च तयार करत आहे.

         सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी रु.1 कोटी प्रस्तावित आहे.

 

10)  पाणी पुरवठा व्यवस्था :

10.1 )  अमृत योजना -2.0  पाणी पुरवठा व्यवस्था :

अमृत योजना - 2.0 अंतर्गत पाणी पुरवठा विस्तारीकरणासाठी रु. 323 कोटी 72 लक्ष रकमेचा आराखडा मंजूर असून या  योजनेंतर्गत 14 जलकुंभ, 85 कि.मी. लांबीची वितरण व्यवस्था, 1 एम.बी.आर. 10 द.ल.लि. ची मुख्य जलसंतुलन टाकी  व 4 ठिकाणी  संप बांधणे व पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्याच्या कामाचा अंतर्भाव आहे. यामध्ये 18,255 हाऊस कनेक्शन देण्यात येणार असून सुमारे 1,14,248 कुटुंबाना या योजनेचा लाभ होणार आहे. या कामांतर्गत 4 पॅकेज पैकी 3 पॅकेजसाठी कामे सुरु असून सद्यस्थितीत 40% कामे पुर्ण झाली आहेत व  उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. मार्च 2026 अखेर सदरची कामे पुर्ण करण्याचे नियोजन आहे.

अमृत योजना - 2.0 अंतर्गत 2000 मी.मी. व्यासाची सोनाळे जंक्शन ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यासाठी रु. 96 कोटी 66 लक्ष च्या रक्कमेस मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत सोनाळे जंक्शन ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यत 2000 मिमी व्यासाची मृदुपोलादी 4.45 किमी लांबीची जलवाहिनी टाकणे यामध्ये 3.25 कि.मी.राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने व कल्याण जंक्शन ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यत 1.20 कि.मी. लांबीचा समावेश आहे.

अमृत योजना - 2.0 अंतर्गत टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील पंपाची क्षमता वाढविणे या कामासाठी रु. 55 कोटी व ठाणे शहरातील पंपीग क्षमता वाढविणेसाठी रु. 16 कोटी 50 लक्ष रक्कमेची  मान्यता प्राप्त असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घेणेबाबतची कार्यवाही सुरु आहे.

यासाठी सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात रु.80 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

10.2)   नगरोत्थान महाअभियान :

नगरोत्थान महाअभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील अस्तित्वातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबुतीकरण व सक्षमीकरण करणेचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामासाठी  रु. 98 कोटी 29 लक्ष रकमेची योजना मंजुर करण्यात आली आहे.  यामध्ये राज्य शासन 50% व महापालिका हिस्सा 50% असा सहभाग आहे. या कामांतर्गत 1 जलकुंभ, 75 कि.मी. लांबीची वितरण व्यवस्था व 2 ठिकाणच्या पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्याच्या कामांचा अंतर्भाव आहे. ठाणे शहरातील सर्व 9 प्रभाग समिती अंतर्गत ही कामे करण्यात येणार असून यासाठी निविदा मागविण्यात आलेली आहे. सदरचे काम 2 वर्ष कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. या कामामुळे शहरातील सर्व प्रभागात पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबुतीकरण करण्यात येईल, यामुळे वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकापर्यत पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.

     10.3 )  दिवा व मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत वितरण व्यवस्था  :

मुंब्रा व दिवा या दोन प्रभागांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी दिवा व मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा (रिमॉडेलिंग) व नव्याने जलकुंभ बांधणेचे काम शासन निधी रु.240 कोटी 29 लक्ष मधून हाती घेण्यात आले आहे.  सदर प्रकल्पांतर्गत एकूण 12.541 कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी टाकणे, 99.172 कि.मी. लांबीची वितरण जलवाहिनी टाकणे व जलकुंभ बांधणेच्या कामाचा समावेश आहे. त्यापैकी एकूण 8.937 कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी व 84.791 कि.मी. लांबीची वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच सद्यस्थितीतील जागा उपलब्धतेनुसार मुंब्रा व दिवा येथे 7 जलकुंभाची जागा अंतिम करण्यात आली असून त्यापैकी कौसा, मुंब्रा येथे 2 जलकुंभ बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.  उर्वरीत 5 जलकुंभांचे सविस्तर डिझाईनचे काम सुरु आहे. सदर प्रकल्पाची भौतीक प्रगती 80% आहे. सदर प्रकल्प माहे डिसेंबर 2025  पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

[4:26 pm, 7/3/2025] Ravindra Manjarekar Tmc: part 2                                                                                                                                                                                                11)  मलनि:सारण योजना :

11.1) पुनर्प्रक्रियायुक्त पाणी (Tertiary Treatment Plant ):

         कोपरी मलप्रकिया केंद्र येथे Public Private Partnership (PPP) तत्त्वावर  मलजलावर तृतीय अवस्थेत प्रकिया करणेसाठी  5 MLD क्षमतेचा Tertiary Treatment Plant उभारणी करण्याचे काम सुरु असून मे 2025 पर्यंत सदर Tertiary Treatment Plant कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. तसेच, भविष्यामध्ये इतर मलप्रकिया केंद्रातील मलजलावर तृतीय अवस्थेत प्रक्रिया करणेसाठी 50 MLD क्षमतेचे Tertiary Treatment Plant उभारणी करणेचे प्रयोजन आहे. सदरचे पुनर्प्रक्रियायुक्त पाणी बांधकाम व्यवसायिक, उदयोगधंदे, उदयाने इत्यादींना सशुल्क पुरविले जाणार आहे.

11.2) नाले बांधकाम :

ठाणे महानगरपालिका हद्दीतील नाल्यांची एकूण लांबी 278 कि.मी. इतकी आहे. यापैकी 140 कि.मी. लांबीचे आर.सी.सी. स्वरूपाच्या नाल्यांचे बांधकाम केलेले असून अजून  138 कि.मी. लांबीचे नाले बांधकाम करणे बाकी आहे. 

पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याकरीता व पूर परिस्थिती टाळण्याकरीता ठाणे महानगरपालिकेने नाले बांधकामाची प्राधान्यक्रम यादी तयार केलेली आहे. या नाल्यांचे बांधकामाकरीता शासनाकडून  रू.189 कोटी 66 लक्ष निधी मंजूर असून यामध्ये एकूण 10.80 कि.मी. लांबीचे नाले व कर्ल्व्हटचे बांधकाम सुरू करण्यात येत आहेत. सदरची कामे दोन वर्षात पुर्ण करण्यात येतील. सदरची कामे पुर्ण झाल्यानंतर पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत होईल व Water logging समस्येचे निराकरण होईल. 

12) इमारती  बांधकाम व विस्तारीकरण  :

12.1) महानगरपालिका नवीन प्रशासकीय भवन :

            ठाणे शहराचा होत असलेला विकास आणि वाढत्या लोकसंख्येमुळे नागरीकांना तत्पर नागरी सुविधा पुरविणेसाठी सध्याचे महानगरपालिका भवन अपुरे पडत असल्याने  ठाणे महानगरपालिकेकरीता नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सदरचे बांधकाम हे शासन निधी व महापालिका निधीतून प्रस्तावित आहे.

 नवीन प्रशासकीय इमारतीची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत.

•         प्रस्तावित नवीन प्रशासकीय भवन इमारत दोन भागामध्ये विभागलेली असून प्रशासकीय इमारत तळ+32 मजली आहे. तसेच महासभा आणि इतर सभागृहांची  इमारत तळ +5 मजली आहे.

•         सदर कामाकरीता पहिल्या टप्प्यांमधील कामासाठी 727.65 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

•         एकूण 1,16,903 चौ.मी. इतका कन्स्ट्रक्शन एरिया आहे. यापैकी 71,044 चौ.मी. मेन ऑफिस इमारतीचा बिल्टअप एरिया असून 9,859 चौ.मी. महासभा इमारतीचा बिल्टअप एरिया आहे.

•         इमारतींमध्ये 36,000 चौ.मी. इतके क्षेत्र  पार्किंग सुविधेकरीता असणार आहे. प्रस्तावित नवीन इमारत पुर्णपणे करटन वॉलसह आकर्षक व दर्शनी भाग कलाकृती युक्त असणार आहे.

•         प्रस्तावित प्रशासकीय भवन इमारत ही आधुनिक आणि ऐतिहासिक वास्तुकलेचा उत्कृष्ट संगम असून महानगरपालिकेकरीता पहिल्यांदाच अशा प्रकारची इमारत बांधण्याचे नियोजन आहे.

12.2) मुंब्रा प्रभाग कार्यालय :

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा प्रभाग समितीसाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत नाही, त्यामुळे सदर समितीच्या कार्यक्षेत्रातील कौसा येथील आरक्षित भुखंडावर मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयाकरिता नविन इमारत बांधणे प्रस्तावित आहे. सदर कामासाठी रु.45.27 कोटी एवढ्या अंदाजखर्चास मान्यता मिळालेली आहे. सदर कामी 2850 चेो .मी, क्षेत्रफळाच्या जागेत तळ + 3 मजले इमारतीचे आराखडे तयार केलेले असून, त्यानुसार बांधकामाचे क्षेत्रफळ सुमारे  47000  चेो. मी.  एवढे असणार आहे.

12.3) बहुउद्देशीय इमारत :

     प्र.क्र. 05 मधील शिवाईनगर येथील ठा.म.पा. शाळा क्र. 47 करिता राखीव भूखंडावर स्व. सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत बांधणेचे काम मंजूर आहे. यामध्ये सुविधा भुखंडाचे क्षेत्रफळ  1791 चौ.मी असून  बांधकामाचे क्षेत्रफळ  5125 चौ.मी. आहे . यामध्ये पार्कींग व्यवस्था, वर्गखोल्या, वाचनालय, कार्यालये, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, मिटींग लॉबी इत्यादीची व्यवस्था असणार आहे.

12.4) प्रशासकीय प्रशिक्षण संस्था :

        वसंत विहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह बांधणेचे प्रस्तावित असून  यामध्ये सुविधा भुखंडाचे क्षेत्रफळ  2600 चौ.मी. असून  बांधकामाचे क्षेत्रफळ  7385 चौ.मी आहे. सदर इमारत ही अंतर्गत तळ + 9 मजल्याची असून यामध्ये पार्किंग,प्रशासकीय ॲडमिन विभाग, 5 क्लास व स्टडी रुम व  राहण्यासाठी 42 रुम्स ,2 लायब्ररी,2 कॉम्प्युटर रुम,  3 वॉर्डन रुम, ऑडिटोरियम, स्टाफ रुम, इनडोअर जिम, मुले व मुलींसाठी होस्टेल, मेडीटेशन रुम इ. कामांचा समावेश आहे

12.5) बॅडमिंटन हॉल विस्तारीकरण :

        दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलचे विस्तारीकरण करणेसाठी रु.41.64 कोटी शासन निधी मंजूर आहे. यामध्ये वाढीव सुमारे 30,000 चौ.फूट क्षेत्रफळाचे बांधकाम करुन 3 मजले वाढविण्यात येणार आहेत. तसेच नवीन 5 अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट तयार करणे व प्रशिक्षणार्थी मुले व मुलींसाठी  वसतीगृहाच्या स्वतंत्र खोल्या बांधणेत येणार आहेत.

 

13) परिवहन सेवा :

भविष्यातील बससेवेतील प्रस्तावित वाढ :

           केंद्र शासनाच्या PM-E Bus सेवा योजनेअंतर्गत ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेस 100 ई - बसेस मंजूर झाल्या असून, येत्या आर्थिक वर्षात परिवहन सेवेकडे टप्प्याटप्प्याने बसेस दाखल होणार आहेत.

             सन 2022-23 ते 2025-26 या आर्थिक वर्षात केंद्र शासनाच्या NCAP अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार प्राप्त होणाऱ्या अनुदानातून ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडे 180 इलेक्ट्रीक बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.

            इलेक्ट्रीक बसेसच्या संख्येत वाढ झाल्यानंतर खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल. त्यामुळे डेड कि.मी. कमी होतील. तसेच प्रदुषण पातळीत घट होईल. कमी खर्चाच्या वाहतूक सुविधेमुळे नागरिकांच्या प्रवास भाडे खर्चात  व इंधन खर्चात बचत होणार आहे. 

        ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेसाठी  सन 2025-26 साठी सहाय्यक अनुदानापोटी रु.280 कोटी तरतूद करण्यात आली आहे.

14)   गतिमान वाहतुक व्यवस्था :

14.1) कोस्टल रोड : बाळकुम - गायमुख विकास आराखड्यातील रस्ता (कोस्टल रोड) विकसित करणे :

  ठाणे शहरातून जाणारा घोडबंदर रस्ता हा प्रचंड वाहतुकीचा व वर्दळीचा असल्यामुळे विकास आराखडयामध्ये दर्शविलेला 40-45 मी. रुंद आणि 13.447 कि.मी. लांबीचा सदर रस्त्यास समांतर बाळकुम ते गायमुख (कोस्टल रोड) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आर्थिक सहकार्यातून विकसित करण्यात येणार आहे.

   या कामी रु.3364.62 कोटी इतक्या रक्कमेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळालेली आहे. 

  सदर प्रकल्पाची लांबी 13.447 कि.मी. असून रुंदी 40 ते 45 मीटर आहे. यामध्ये 483 मीटर ओपन कट असून 4621 मी. Road on embankment आहे व  8343 मी. Road on Stilt / Viaduct bridge आहेत.

सदर प्रकल्पाकरिता 54.29 हेक्टर जमीन लागणार असून आतापर्यंत 37.85 हेक्टर (69.72%) जमीन उपलब्ध झालेली आहे. तसेच 6.08 हेक्टर (11.20%) जमीन संपादन करण्याची कार्यवाही सुरु आहे.

मोघरपाडा येथील शासनाची 10.36 हेक्टर (19.08%) जमीन MMRDA मार्फत संपादन करण्यात येणार आहे.

14.2) ठाणे -बोरीवली दरम्यान संजय गांधी नॅशनल पार्क खालून मार्ग तयार करणे (Thane-Borivali Tunnel) :

 

            ठाणे शहरांमधून मुंबई कडे जाण्यासाठी पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच मुंबईच्या पश्चिम उपनगरांकडे जाण्यासाठी घोडबंदर रोड मार्गे फाऊंटन हॉटेल मिरा भाईंदर मार्ग अशा एकूण 23 कि.मी लांबीच्या मार्गाने जावे लागते. सदरचा मार्ग जास्त लांबीचा असल्याने प्रवासास वेळ जास्त लागतो. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून घोडबंदर रोड येथील ब्रम्हांड ते बोरीवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. सदर मार्गाची एकूण लांबी 11.85 कि.मी. इतकी असून यामध्ये भुयारी बोगद्यांची लांबी 10.25 कि.मी. इतकी आहे. तसेच प्रकल्पाचा अंदाजित खर्च 16600.40 कोटी इतका आहे. सदर प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामास माहे मे 2023 मध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. सदरचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठाणे ते बोरीवली हे अंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार असून या मुळे या मार्गावरील प्रवासाच्या  वेळेमध्ये व इंधनाची बचत होणार आहे.

            तसेच सदरचा मार्ग थेट कोस्टल रोडला उन्नत मार्गाने जोडण्याबाबतचे नियोजन आहे. त्यामुळे बोरीवलीवरुन येणारी वाहतूक ठाणे शहरातून न जाता थेट उन्नतमार्गाने कोस्टल रोडला जोडली जाणार असल्याने ठाणे शहरात वाहतूक कोंडी होणार नाही.

14.3) ठाणे शहरांमधून जाणाऱ्या वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्गिकेच्या संलग्न स्थानकांकरीता पादचारी पुलांचे काम करणे :

 

     ठाणे शहरांमधून वडाळा ते कासारवडवली आणि पुढे गायमुख पर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेमार्फत करण्यात येत असून आगामी एक  ते दिड वर्षामध्ये प्रकल्पाचे काम पुर्ण होऊन मेट्रोची प्रत्यक्ष वाहतुक सुरु होईल. सदर मार्गावर असलेल्या मुलुंड चेक नाका ते गायमुख पर्यंतच्या भागामध्ये येत असलेल्या मेट्रो स्थानकांकडे प्रवाश्यांना ये जा करण्यासाठी एकूण 9 ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचे मुंबई महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरण यांचेमार्फत प्रस्तावित करण्यात आले आहे.  प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आलेली असून  मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच घोडबंदर रस्त्यावर महानगरपालिकेमार्फत बांधण्यात आलेल्या पादचारी पुलांना मेट्रो स्थानकांपर्यंत जोडण्याची कार्यवाही करणेबाबत मुंबई महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरण यांना कळविण्यात आलेले आहे.

14.4) ठाणे घोडबंदर रस्त्याचे दोन्ही बाजुच्या  सर्व्हिस रस्त्यांचा  मुख्य रस्त्यामध्ये समावेश करुन सलग मार्ग तयार करणे :

        ठाणे घोडबंदर रस्त्यावर वडाळा ते कासारवडवली व पुढे गायमुख पर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम करण्यात येत असून हे काम आगामी 1 ते दीड वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. सदर मार्गिका मुख्य रस्त्याचे मध्य रेषेमधून जात असल्याने अस्तित्वातील घोडबंदर रस्त्याची काही ठिकाणी रुंदी कमी होत आहे. भविष्यात या रस्त्यावरील वाढणारी वाहतुकीची वर्दळ पाहता घोडबंदर रस्त्याचे कापुरबावडी नाका ते गायमुख पर्यंत दोन्ही बाजुचे असलेले सेवा रस्ते मुख्य रस्त्यामध्ये समाविष्ट करुन मुख्य रस्त्याची रुंदी वाढविण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरण यांचेमार्फत हाती घेण्यात आलेले आहे. तसेच या रस्त्यावरील मुख्य चौकांमध्ये मेट्रो लाईनच्या खाली उड्डाणपूल बांधण्याची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये वाहतुकीकरीता जास्त रुंदीचा रस्ता उपलब्ध होणार असून ठाणे घोडबंदर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे.

14.5) घाटकोपर ते ठाणे दरम्यान इर्स्टन फ्री वे चा विस्तार :

       सद्यस्थितीत इर्स्टन फ्री वे घाटकोपर येथे संपतो. तदनंतर नाशिक, घोडबंदर कडे येणारी वाहने ही पूर्व द्रुर्तगती मार्गावरुन ठाणे तीन हात नाका मार्गे इच्छीत स्थळी जातात व त्यामुळे ठाणे शहरामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. सदरची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून फ्री वे चा विस्तार कोपरी टोलनाका - कन्हैयानगर - साकेत - कोस्टल रोड असा 2+2  मार्गिकेचा 14 कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग असणार आहे. सदर कामासाठी रु.2,900 कोटी इतक्या अंदाजखर्चास एम.एम.आर.डी.ए. मार्फत मंजूरी मिळाली आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मार्फत होणार आहे.

14.6) आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग :

           ठाणे शहरामध्ये आनंदनगर ते साकेत दरम्यान पूर्व द्रुतगती  मार्गावर उन्नत रस्त्याचे बांधकामासाठी रु.1275 कोटी इतक्या खर्चास एम.एम.आर.डी.ए. ने मंजुरी दिलेली आहे. सदर रस्त्याची लांबी 8.25 कि.मी. असून, सदरचा उन्नत मार्ग 3+3  मार्गिकेचा असणार आहे. सदर प्रकल्पामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईकडून बाहेर जाण्या-या वाहतुकीला ठाणे शहरात पूर्व द्रुतगती मार्गावर न उतरता परस्पर बाहेर जाणे सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे ठाणे शहरातील वाहतुक व बाहेरील वाहतुकीमुळे ठाणे शहरातील वाहतुक कोंडी कमी होऊन प्रदुषणामध्ये घट होणार आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मार्फत होणार आहे.

14.7) ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे इस्टेटला जोडणे :

           ठाणे शहर व कोपरी येथील रहिवाशांना वागळे इस्टेट परिसरात जाण्यासाठी तीन हात नाका येथून जावे लागते मात्र तीन हात नाका येथील  वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील प्रवासासाठी जास्तीचा वेळ लागतो. ठाणे शहर व कोपरी येथील नागरीकांना वागळे इस्टेट येथे जाणेसाठी पर्यायी मार्गाचा विचार करता कोपरी पूलासोबत सब-वे चे काम पूर्ण झाले असून सब-वे च्या वागळे इस्टेट कडील जोड रस्त्याचे काम एम.एम.आर.डी.ए. मार्फत पुर्ण करण्यात आले आहे. सदर रस्ता नागरीकांसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच सदर अंडरपास मधून प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्गिकेचे काम ठाणे स्मार्ट सिटी लि. यांच्यामार्फत सुरु असून हे काम माहे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळे जुने ठाणे रेल्वे स्टेशन कोपरी पूर्व, तसेच ठाणे स्टेशन पश्चिम पासून नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकांकडे येण्याजाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

15)   ठाणे महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारे पी.पी.पी. प्रकल्प :

 

15.1) कोलशेत येथील पार्क आरक्षण क्र. 5 वर "अॅम्युजमेन्ट व स्नो पार्क प्रकल्प" :   सुमारे 25 एकर जागेत हा प्रकल्प वर राबविण्यात येणार असून यामध्ये

i) स्नोपार्क :  700 लोकक्षमतेचा मुख्य स्नोएरिया, स्नोराइड्स, जॅकेट कलेक्शन रूम्स, स्टाफ रूम्स, पुरुष व महिला चेंजिंग रूम्स, इलेक्ट्रिक इक्विपमेंट रूम्स ,  कूलिंग क्षेत्र, स्टोअर्स रूम्स, टिकेटिंग एरिया,  डिस्क-ओ-24, गॅलिओन, जायंट डिस्कव्हरी, टीकप, टॉपस्पिन, गो-कार्टींग, झिपलाइन इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत.  

ii) अॅम्युजमेंट पार्क: या अंतर्गत  आठ ते दहा ड्रायराइड्स,  रोलरकोस्टर, स्कायटॉवर, नेचरट्रेल, ऍडमिन बिल्डिंग & वर्कशॉप, पार्किंग प्लाझा, पब्लिक टॉयलेट, फूडपार्क, रेंटल स्टोअर्स, इनडोअर गेमिंग, हॅप्पीस्ट्रीट इत्यादी प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण होणार आहेत.

15.2)   ‘‘दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे "आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस् क्लब" :

 

            दादोजी कोंडदेव स्टेडीयम लगत 2500 चौ. मी. च्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस् क्लब, प्रेस क्लब, व्ही.आय. पी. गॅलरी, बँक्वेट, निवासी व्यवस्था, जिम्नॅशियम, बीझनेस सेंटर सुविधा व या एकत्रित सुविधांचे मुख्य प्रेक्षागृहाशी संलग्नता (Integration) आयकॉनिक इमारत, पंचतारांकित दर्जासह क्रिडा प्रेक्षागृह इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.      

15.3)   भूखंड क्र. 463 पैकी मंजुर विकास प्रस्ताव क्र. 1613 अंतर्गत मंजुर सुधारित विकास आराखडयातील MRTS ने आरक्षित भूखंडावर इनडोअर स्पोर्ट्स क्लब व वाचनालय अभ्यासिका (Indoor sport club) :

 

            कॅडबरी जंक्शन जवळील  2105 चौ. मी. भूखंडावर 3 बेसमेंट सह तळ + 9 मजली  इमारतीचे नियोजन असून तळ मजल्यावर मेझानाइन शॉप, पहिल्या मजला ते तिसरा मजल्या वर ऑफीसेस (प्रति मजला 9 ऑफीस), चौथ्या मजल्यावर जिम, एम.एम.ए. व पिस्तुल शूटिंग, पाचव्या मजल्यावर लायब्ररी, सहाव्या मजल्यावर कॅफेटेरिया, इनडोअर स्पोर्ट्स क्लब, योगा रुम, डान्स/ झुम्बा रुम, जिमनॅस्टिक रुम, सातव्या मजल्यावर बॅडमिंटन आणि स्क्वॉश कार्ट, आठव्या मजल्यावर सर्विस व नवव्या मजल्यावर स्विमिंग पूल, लाउंज/रेस्ट्रो याप्रमाणे इनडोअर स्पोर्ट्स क्लब व वाचनालय अभ्यासिका प्रस्तावित आहे.

15.4) ठाणे टाऊन पार्क :

         ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर - 5 मधील मौजे कोलशेत व बाळकुम येथील पार्क 8 येथील - 86,270 चौ.मी.  भूखंडावर टाऊन पार्क नियोजित असून त्यामध्ये Planetorium, Aquarium, Science centre & fishermen museum इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे.  हे पार्क ठाणेकरांना व पर्यटकांना एक आगळ्यावेगळ्या प्रकारची ठाणे शहराची ओळख निर्माण करणारे ठरणार आहे.

15.5) व्हीविंग टॉवर ॲण्ड कन्व्हेंशन सेंटर :

व्हीविंग टॉवर : मौजे मोघरपाडा येथील स.क्र. 30 पै. व मौजे वडवली येथील स. क्र. 126 ते 130 व 82 पै. येथील  305140 चौ.मी.  भूखंडावर  250 मी.  उंचीचे व्हीविंग टॉवर उभारण्यात येणार  असून या माध्यमातून ठाणेकरांना व पर्यटकांना उंचावरून ठाणे शहर परिसराचे मनमोहक व  विहंगम दृष्य दिसणार आहे.  

कन्व्हेंशन सेंटर : सध्या ठाणे परिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाची चर्चासत्रे, परिसंवाद, विज्ञान मेळावे  हे अर्थव्यवस्थेला चालना देणारे असल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांमध्ये व सामान्य लोकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करणेसाठी मोठया आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कन्व्हेन्शन सेंटरची गरज आहे. यासाठी मौजे मोघरपाडा व वडवली येथे  20819 चौ. मी. बांधीव क्षेत्राचे 14871 लोक क्षमतेचे आंतरराष्ट्रीय सुविधांयुक्त कन्व्हेंशन सेंटर  निर्माण करण्यात येणार आहे.

          सद्यस्थितीत या सर्व पी.पी.पी. माध्यमातून राबविण्यात येणा-या प्रकल्पांची व्यावसायिक व्यवहार्यता अंतिम करुन निविदा प्रक्रिया इत्यादी कार्यवाही सुरु करण्यात  येऊन सदरची कामे  सन 2025 -26 मध्ये सुरु होणार  आहेत.

16)   क्लस्टर योजना :

•           ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाकरीता  महानगरपलिकेकडून आता पर्यंत एकूण क्षेत्र - अंदाजे 1657 हेक्टरचे एकूण 49 नागरी पुनरुत्थान आराखडे (URP) अधिसुचित करण्यात आलेले आहेत.

•               यु.आर.पी. क्र.12 किसननगर अंतर्गत यु.आर.सी.क्र. 1+2 च्या क्षेत्राची अंमलबजावणी करणेकामी सिडको या संस्थेस ठाणे महानगरपालिकेच्या दि.07/02/2024 रोजीच्या पत्रान्वये सदर 44.36 हे. क्षेत्राकरीता इरादापत्र (Letter of Intent) देण्यात आलेले आहे.

•           LOI नुसार यु.आर.पी. क्र.12 किसननगर अंतर्गत यु.आर.सी.क्र. 1+2 क्षेत्रामध्ये एकूण 29,186 लाभार्थ्यांचे पुनर्वसन सिडको या संस्थेमार्फत करण्यात येणार असुन त्याकरीता एकूण 49 पुनर्वसन इमारतींचे बांधकाम प्रस्तावित आहे.

•           सदर 44.36 हे. क्षेत्रापैकी काही भूखंडावर सद्यस्थितीत पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सिडको या संस्थेमार्फत सुरु आहे.

•           तसेच यु.आर.पी.क्र.12 (किसननगर) अंतर्गत यु.आर.सी. क्र. 5+6 च्या क्षेत्रामध्ये अंमलबजावणीची कार्यवाही सुरु करण्यासाठी महाप्रीत या संस्थेस ठाणे महानगरपालिकेच्या  पत्रान्वये Letter of Intent (LOI) देण्यात  आले आहे.

•           LOI नुसार यु.आर.पी. क्र.12 किसननगर अंतर्गत यु.आर.सी.क्र. 5+6 क्षेत्रामध्ये एकूण 14,071 लाभार्थ्यांचे पुनर्वसन महाप्रीत या संस्थेमार्फत करण्यात येणार असुन त्याकरीता एकूण 22 पुनर्वसन इमारतींचे बांधकाम प्रस्तावित आहे.

•           सदर 39.38 हेक्टर क्षेत्रापैकी काही भूखंडावर सद्यस्थितीत पुनर्वसन इमारतींचे बांधकाम महाप्रीत या संस्थेमार्फत सुरु आहे.

•           महाप्रीत या संस्थेने यु.आर.पी.क्र.1 कोपरी, यु.आर.पी.क्र.3 राबोडी, यु.आर.पी.क्र.5 गोकुळनगर, यु.आर.पी.क्र.12 किसननगर अंतर्गत यु.आर.सी. क्र. 3,4 व 7, यु.आर.पी.क्र.13 लोकमान्यनगर, यु.आर.पी.क्र.41 दिवा-1, यु.आर.पी.क्र.42 दिवा-2 व यु.आर.पी.क्र.43 साबेगाव या आराखडयांमधील क्षेत्राचा देखील नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत विकास करण्यास स्वारस्य दर्शविले असून  त्यास ठाणे महानगरपालिकेने मान्यता दिली आहे.

•           सदर आराखडयांची अंमलबजावणी करणेकामी ठाणे महानगरपालिका व महाप्रीत संस्था यांच्यामध्ये  Supplementary MoU करण्यात आला आहे.

•           उक्त योजनेची जलद गतीने अंमलबजावणी होण्याकरीता, ठाणे महानगरपालिका व महाप्रीत संस्थेअंतर्गत Thane Cluster Development and Area Improvement Company Limited (TCDAICL) या नावाने एक स्वतंत्र Special Purpose Vehicle (SPV) स्थापित करणेत आली असून दि.16/09/2024 रोजी Memorandum of Association (MoA) व Article of Association (AoA) स्वाक्षांकित करण्यात आलेले आहे.

•           शासनाच्या नगर विकास विभागाकडील शासन निर्णयान्वये ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रेखांकनामधील अतिक्रमित 60.32 हेक्टर क्षेत्राकरीता ठाणे महानगरपालिकेची नियोजन प्राधिकरण म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

17)  आनंदाश्रम परिसर सुधारणा :

               शहराच्या मध्यवर्ती भागात मोक्याच्या ठिकाणी  असलेल्या  तसेच सर्व ठाणेकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणा-या आनंदाश्रम परिसराचा सौंदर्यांत्मक  विकास करण्यासाठी सुशोभित पदपथ, आकर्षक रस्ते दुभाजक, शोभीवंत दिवे , साईनेजेस , भित्तीचित्रे, म्युरल्स इत्यादी बाबी करण्याचे नियोजित आहे. यासाठी  सन 2025-26 या आर्थिक वर्षात आनंदाश्रम परिसर सुधारणा या लेखाशीर्षांतर्गत रु. 3 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

 

18)   क्रिडाग्राम उभारणे :

           ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आयोजित होणा-या विविध क्रिडास्पर्धांच्या क्रिडापटुंसाठी बाळकुम येथील मुंबई विद्यापिठाच्या उपकेंद्राचे आवारात क्रिडाग्राम विकसित करणेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात रु.5 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

19)  प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) PMAY-U - 2.0 :

        ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बेतवडे सर्व्हे नं. 78 व सर्व्हे नं. 15/1 या दोन्ही  भूखंडावर राज्य व केंद्र शासनाची  प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) PMAY-U-2.0 राबविण्यात येणार असून या माध्यमातून, योजनेच्या निकषानुसार कमी उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना सुमारे 3084 सदनिका (30 चौ. मी. चटई क्षेत्र प्रति सदनिका) उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.  

         यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच लाभार्थ्यांची पात्रता व निश्चिती करण्यासाठी संस्थेच्या नियुक्तीची कार्यवाही सुरु आहे.

          सदर योजना सन 2025-26 मध्ये सुरु करुन 2 वर्षांत पुर्ण करण्याचा मानस आहे.

20) प्रशासकीय सुधारणा

1.      सामान्य प्रशासन विभाग :

•         आस्थापनेवरील रिक्त पदांच्या भरतीकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे.

•         ई-सेवा पुस्तक संगणक प्रणाली विकसित करण्याचे मानस आहे.

 

2.      प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग :

  आपत्तीच्या घटनेसंदर्भात प्रतिसाद वेळ (Response Time) कमी करणेकरिता विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

  आपत्ती व्यवस्थापन सक्षमीकरण अंतर्गत मनुष्यबळास प्रशिक्षण व अत्याधुनिक यंत्रणा तसेच उपकरणे यांची उपलब्धता करुन घेण्याचे नियोजन आहे.

3.       माहिती व तंत्रज्ञान विभाग :

सुकर जीवनमान ( Ease of Living)

  प्रत्येक विभागांतर्गत प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये किमान एक सेवा सुलभ करण्याचे नियोजन

  नागरिकांना सेवा सुलभ करुन देण्याच्या दृष्टिकोनातून 11 सेवांकरिता नियत कालमर्यादा कमी करणे.

  ठाणेकर नागरिकांना कमीत कमी कालावधीत सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रशासन आग्रही

  ठाणेकर नागरिकांसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील जेणेकरुन  आवश्यक असेल तरच प्रभाग समिती अथवा महापालिका मुख्यालयात प्रत्यक्ष यावे लागेल अशी संगणक प्रणाली विकसित करणे

  ई ऑफिस प्रणालीद्वारे सर्व पत्रव्यवहार ऑनलाईन करणे.

  इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (ICCC) शहरासाठी एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित केंद्र आहे, जे विविध प्रकारच्या सेवा आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये समन्वय साधण्यासाठी वापरले जाते. शहराच्या विविध सेवा आणि प्रणालींचे एकत्रीकरण करून, हे केंद्र अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यास मदत करते.

                  या सर्व योजना, अभियान व प्रकल्पांसाठी सन 2025-26 मध्ये महसुली खर्च रु. 3722 कोटी  93  लक्ष , भांडवली खर्च रु. 1921 कोटी 41 लक्ष , अखेरची शिल्लक रु. 66 लक्षसह एकूण रु. 5645 कोटी खर्चाचे अंदाज प्रस्तावित करण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत