पंचायत समिती कल्याण येथे जागतिक महिला दिन साजरा - महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 


 (जिल्हा परिषद, ठाणे)- जागतिक महिला दिनानिमित्ताने .‌०७ मार्च, २०२५ रोजी पंचायत समिती कल्याण येथे महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला होता. शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती कल्याण, गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कार्यालयात उपस्थित महिला अधिकारी व कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 


        शिबिरासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ.रूपाली खोमणे, उप अभियंता बांधकाम सुदाम महाडिक, सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तसेच पंचायत समिती येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        शिबिरामध्ये पंचायत समिती कल्याण येथील सर्व महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वांचे शुगर तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, स्त्री रोग तज्ञ यांच्याकडून तपासणी, रक्तगट तपासणी, Diabetes Profile, Lipid profile, liver Profile, Kidney Profile‌ यासारख्या सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. तर 74 महिलांचे आभा कार्ड तयार करण्यात आले तसेच 22 लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड तयार करून त्यांना गटविकास अधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 


        तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उत्साह पुर्ण वातावरणात सहभाग नोंदविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत