जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत तालुकास्तरीय महाआरोग्य शिबिर संपन्न
शहापूर तालुक्यातील शिबिरात 989 लोकांची आरोग्य तपासणी
(जिल्हा परिषद, ठाणे)- जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत तालुकास्तरीय एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन .०७ मार्च, २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, डोळखांब, तालुका शहापूर येथे करण्यात आला होता. आरोग्य शिबिराचे उद्घाटन रुग्ण कल्याण समिती सदस्य हरिभाऊ शिंदे व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर नंदकुमार डोहळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी हरिभाऊ शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की लवकर निदान झाले तर उपचार करणे देखील सुलभ होऊ शकते तसेच आजार होऊच नये म्हणून आहार योग्य प्रमाणात करण्याचे सांगितले. सर्वांनीच आयुष्यमान कार्ड काढून अत्यावश्यक प्रसंगी शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा, हे ही त्यांनी आवर्जून सांगितले. या शिबिरा करिता जिल्हास्तरावरून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच पंचायत समिती शहापूर येथील गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांची मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. या शिबिरासाठी तालुका अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
या तालुकास्तरीय शिबिरात एकूण 989 लाभार्थींना लाभ दिला गेला. त्यापैकी 463 पुरुष, 526 स्त्रियांचा सहभाग होता. स्त्रियांचे आजार 289, बालकांचे आजार 108, नाक कान घसा 42, दाताचे आजार 63, डोळ्यांचे आजार 393, मुखाचे आजार 11, त्वचा विकार 68, अस्थिरोग विकार 56, मानसिक रोग 16, मेंदूचे आजार 2, गोपाळकृष्ण चॅटींग ट्रस्ट आणि अनिल कॅन्सर क्लिनिक डोंबिवली यांच्याकडून ब्रेस्ट कॅन्सर साठीची मेमोग्राफी तपासणी 30 महिलांची करण्यात आली, आभा कार्ड 17, आयुष्यमान कार्ड-13 NCD आजार 208, प्रयोगशाळा तपासणी एकूण 288, मोफत चष्मे वाटप 310, ईसीजी 33, मोतीबिंदू 40, डोळ्याचे कायम अपंगत्व 2, तिरळेपणाचे 2 रुग्ण शोधण्यात आले.
डॉ. अशोक नांदापूरकर, उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, डोळखांब येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड, तसेच त्यांच्या सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेवका यांनी शिबीर यशस्वीरित्या संपन्न केले.
या शिबिराकरिता न्यूरोलॉजिस्ट डॉ. दिलराज कडलस, बालरोग तज्ञ डॉ. श्याम राठोड, मुखरोग तज्ञ डॉक्टर स्वप्निल विसपुते स्त्री रोग तज्ञ डॉ. अविनाश बढीये, मानसरोग तज्ञ डॉ. रवींद्र तांबे, हृदयरोग तज्ञ डॉ. रोहित बोबडे, त्वचारोग तज्ञ डॉ. प्रशांत जावरे, कान नाक घसा तज्ञ डॉ. वैभव किरपण, अस्थिरोग तज्ञ डॉ. समीर शेलवले जनरल फिजिशियन डॉ. हिरामण साबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल जाधव, डॉ. आर्यचाणक्य भोळे, डॉ. अभिजीत वानखेडे आदी उपस्थित होते.
Post a Comment