ठाणे महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुधवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. 'जय शिवाजी, जय भारत' या पदयात्रेच्या दरम्यान, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने, उपायुक्त सचिन सांगळे, शंकर पाटोळे, मीनल पालांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते.
महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, उपनगर अभियंता गुणवंत झांब्रे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, उप माहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
त्याचबरोबर, ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य पत्रकार आदी उपस्थित होते.
Post a Comment